हिंदी साहित्यिकांचे विचार ऐका व वाचन करा... सी. पी. मिश्र
बिटको महाविद्यालयात विश्व हिंदी दिवस साजरा...
नाशिकरोड : " भारतीय संस्कृतीमध्ये भाषेला महत्त्व असून ज्ञान व संयम व विश्वास वाढीस लागतो. प्रख्यात विविध साहित्यिकांचे साहित्य यांचे वाचन करून कार्यक्रमा मधूनच त्यांचे विचार ग्रहण करा ऐका. लेखन कला व बोलण्याचे कौशल्य प्राप्त करा. हिंदीच्या प्रसार होण्यासाठी तरुण वयातच महाविद्यालयातील विविध स्पर्धांमधून सहभागी होऊन कौशल्य सिद्ध करा. त्यातूनच नेतृत्व कौशल्य आत्मसात करा. भाषांमधून संस्कार मिळतात, " असे अ. भा. साहित्य परिषद,नाशिकचे अध्यक्ष व साहित्यिक सी. पी. मिश्र यांनी सांगितले.
गोखले एज्युकेशन सोसायटीच्या नाशिकरोड येथील बिटको महाविद्यालयात शुक्रवार दि. १० जानेवारी २०२५ रोजी कॉमर्स लॅब मध्ये हिंदी विभागातर्फे विश्व हिंदी दिवसाच्या निमित्ताने सप्ताह साजरा करण्यात आला. त्यावेळेस समारोप सत्रात ते उपस्थित विद्यार्थी व शिक्षकांना मार्गदर्शन करताना बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. मंजुषा कुलकर्णी यासह उपप्राचार्य डॉ. आकाश ठाकूर, हिंदी विभाग प्रमुख डॉ. संतोष पगार, कनिष्ठ महाविद्यालयाच्या पर्यवेक्षिका प्रणाली पाथरे आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रारंभी कु. श्रुती दिवे हिने स्वागत गीत सादर केले. मान्यवरांचे स्वागत प्राचार्या डॉ. मंजुषा कुलकर्णी यांनी केले. प्रास्ताविक करताना डॉ. संतोष पगार यांनी या सप्ताहा मध्ये पार पडलेल्या विविध स्पर्धा व उपक्रमाबाबत माहिती दिली.
अध्यक्षीय मार्गदर्शन करताना डॉ. मंजुषा कुलकर्णी यांनी," हिंदी ही जगातील सर्वाधिक बोलली जाणारी भाषा असून हिंदी भाषेच्या संवर्धनासाठी व तिचा विकास होण्यासाठी हिंदी भाषा आपली मानून विचार व भावना तसेच ओळख यासाठी प्रसार होण्यासाठी सन्मान प्राप्त होण्यासाठी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी विविध उपक्रम व स्पर्धांमध्ये सहभागी व्हावे, " असे सांगितले. या सप्ताह मध्ये पार पडलेल्या विविध स्पर्धामधील विजेत्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यात काव्यवाचन स्पर्धा विजेते प्रथम द्वितीय व तृतीय अनुक्रमे पुढीलप्रमाणे :- वैष्णवी पागेरे, कृष्णा बोराडे, प्रांजली काळे तसेच निबंध लेखन स्पर्धा विजेते - दर्शन अभंग, खिलेश शिंदे, खुशी कुमावत.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विभागातील विभागप्रमुख डॉ. संतोष पगार , डॉ. संदीप तपासे, डॉ. सागर चौधरी, प्रा. चंद्रकांत तारू, सौ. मीना शिंदे, संदीप आरोटे यासह हिंदी विभागातील विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्र व नियोजन खुशी कुमावत, ब्लेसी गांगुर्डे, नेहा धात्रक व सोनाली वाघ यांनी केले.