खोकल्यासाठी प्रभावी उपाय.....
(१) हळदीच्या दुधात खारिक मिसळून घेतल्यास खोकला बरा होतो. दूधामध्ये दोन खारिक व हळद उकळून घ्यावे व थंड झाल्यावर घ्या. याने कफ सुटतो व बाहेर पडतो . खोकला बरा होतो.
(२) आले व मध एकत्र करून घेतल्यास आराम मिळतो व खोकला बरा होतो.
(३) लसुण प्रकृतीने उष्ण आहे. त्यात एन्टि बॅक्टेरियल गुण असतात, लसणाच्या पाकळ्या तुपात तळून घ्याव्यात व गरम गरम खाव्यात, याने गळ्याला शेक बसतो. व बरं वाटतं.
(४) काळे मिरे, जायफळाची पूड व मध एकत्र करून घेतल्यास लवकर फायदा होतो. दिवसातून दोन तीन वेळा घ्यावे.
(५) पिंपळी गाठ कुटून घ्यावे व मधात मिसळून चाटण म्हणून घेतल्यास खोकला बरा होतो.
(६) खोकला बरा होत नसेल तर नीलगिरीच्या तेलाचे काही थेंब नारळाच्या तेलात मिसळून मग याने छातीला मालिश करा. याने कफ सुटतो व बरं वाटतं.
(७) ज्येष्ठमध हे एक उपयुक्त औषध आहे. खोकल्याची उबळ आली कि, ज्येष्ठमध काडि चघळल्यास ढास जाते. बरं वाटते किंवा ज्येष्ठमध व मध यांचे मिश्रण करून हे चाटण म्हणून घेतल्यास आराम मिळतो.
(८) पुदिना पाने व तुळस. या दोन्ही गोष्टी खोकला बरा करण्यासाठी उपयोगी आहे. १०-१५ पुदिन्याची पाने व १५-१६ तुळशी ची पाने एक ग्लासभर पाण्यामध्ये उकळून अर्ध झाले कि. एक छोटा गुळाचा खडा टाकून गरम गरम प्यावे. याने कफ सुटतो व बरं वाटतं.
(९) लवंग व मध. खोकला आल्यावर नुसती लवंग व मध खाण्यापेक्षा दोन्ही एकत्र करून याचे चाटण दिवसभर घेतल्यास आराम मिळतो. बरेच वेळा रात्री ढास लागते. झोप लागत नाही. अशा वेळी. पाव चमचा जिरेपूड + पाव चमचा सुंठ पावडर एकत्र करून घेतल्यास उबळ जाते. मध मिसळून द्यावे त्यात.
(१०) सर्दि व खोकला झाल्यास मूठभर कडुनिंब पाने धूवून घ्या व एक चमचा ओवा त्यात घालून बारीक वाटावे व हा लेप कानशिलाला लावा. संक्रमण दूर होतील.
(११) खोकला बरा होत नसेल तर चार वेलदोडे व तितकीच सुंठ पावडर एकत्र करून मधात मिसळून चाटण म्हणून घेतल्यास आराम मिळतो.
(१२) नुसती कोरडी ढास लागलु असेल तर दोन वेलदोडे तव्यावर भाजून घ्या पावडर करून त्यात तुप व साखर मिसळून चाटण म्हणून घेतल्यास आराम मिळतो.
१३) सारखा खोकला येत असेल, किंवा श्वास लागत असेल तर एक ग्लास पाण्यात एक चमचा धने व एक तुकडा ज्येष्ठ मध टाकून उकळून घ्यावे आटवून अर्धं करा मग कोमट करून घ्या. याने आराम मिळतो.
(१४) खोकला, कफ, सर्दिवर रोज विड्याचे पान दिवसातून दोन वेळा खावे.
(१५) खोकल्यावर सुंठ पावडर अर्धा चमचा + पिंपळी चूर्ण + बेहडा चूर्ण पाव चमचा हे एक चमचा मधात मिसळून चाटण म्हणून घेतल्यास आराम मिळतो.
(१६) खोकला झाल्यास बडिशेप व खडिसाखर खावी.
(१७) एक चिमटी काताची पावडर घेऊन त्यावर गरम पाणी प्यावे. बरं वाटते.
(१८) खोकल्यातून रक्त येत असल्यास ओले खोबरे पाव वाटी घेऊन त्यात पाच, सहा मनुका घालून खावे.
(१९) खोकला आल्यावर चिकणी सुपारी खावी.
(२०) खोकला बरा होत नसेल तर तुळशीच्या पानांचा रस दोन चमचे घेऊन त्यात थोडी खडीसाखर घालून घ्यावे. दिवसातून तीन, चार वेळा घ्यावे. असे तीन दिवस घ्यावे.
(२१) कोरडा खोकला झाल्यास. खसखशीची खिर खावी. मुठभर खसखस भाजून (तुपात). घ्या. मग दूधामध्ये शिजवून घ्या व गरम गरम प्यावे. साखर आवडीनुसार मिसळून द्यावे.
२२) डांग्या खोकल्यावर तुरटि कुटून गरम करून घ्या. मग त्यात पाणी मिसळून ती बशी उन्हात ठेवावी. पाणी निघून जाते. व शुद्ध तुरटी शिल्लक राहते. त्यात एक चमचा मध मिसळून घ्यावे.
(२३) तिळाचे तेल कोमट करून प्यावे.
(२४) बकुळीची फुले ओंजळभर + सोनचाफ्याची ओंजळभर फुले + दोन तांबे पाणी घेऊन साखर घालून काढा करावा व दिवसातून पाव वाटी घ्या.
(२५) अडुळसा पाने वाफेवर उकडून, त्याचा रस काढून घ्यावा व थोडा गूळ घालून पाव कप रस घ्यावा.
(२६) एक कप दूधामध्ये लसणीच्या चार पाकळ्या उकळून घ्यावे.
(२७) ज्येष्ठ मध + खडिसाखर चघळावी.
(२८) कोरफडीची पाने भाजून घ्या. त्यांचा रस काढून घ्यावा. एक चमचा रस घेऊन त्यात मध मिसळून घ्यावे.
(२९) भिमसेनी कापुर व एक चमचा साखर मिसळून चाटण म्हणून घेतल्यास आराम मिळतो.
(३०) खोकला झाल्यास तुळशीची पाने ठेचून व गरम करून या पोटिसने छाती शेकावी.