राष्ट्रवादी युवक काँग्रेस आयोजित “प्रभाग प्रीमियर लीग” चे बक्षीस वितरण संपन्न

राष्ट्रवादी युवक काँग्रेस आयोजित “प्रभाग प्रीमियर लीग” चे बक्षीस वितरण  संपन्न
राष्ट्रवादी युवक काँग्रेस आयोजित “प्रभाग प्रीमियर लीग” चे बक्षीस वितरण  संपन्न

नाशिक (दि.२३ जुन २०२५) – राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांच्या संकल्पनेतून नाशिक शहरातील क्रिकेट होतकरू युवकांना क्रीडा क्षेत्रात संधी प्राप्त करून देण्यासाठी “प्रभाग प्रीमियर लीग” चे बक्षीस वितरण चॅम्पियन टर्फ येथे करण्यात आले. प्रभाग प्रीमियर लीगची सुरुवात रविवार (दि.२२) चॅम्पियन टर्फ, एसएसडी नगर, अमृतधाम लिंक रोड येथे झाली. स्पर्धेच्या बक्षीस समारंभ प्रभागातील विविध मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.

नाशिक शहरातील खेळाडूंना क्रीडा क्षेत्रातील कलागुणांना वाव मिळून देण्यासाठी व त्यांना योग्य संधी निर्माण करून देण्यासाठी युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी टर्फ क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले होते. नाशिक मधील योग्य क्षमता असलेले खेळाडू राज्यस्तरीय, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळून नाशिकचे नावलौकिक वाढवावे याकरिता त्यांनी या स्पर्धेचे आयोजन केले. खेळाडूंना सातत्याने प्रोत्साहन देण्याकरिता व स्पर्धांच्या माध्यमातून राज्यस्तरीय, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडू निर्माण होण्याकरिता विविध स्पर्धांचे आयोजन करणे गरजेचे असते. स्पर्धांचे आयोजन करून खेळाडूंना योग्य परितोषिक दिल्याने त्यांचा आत्मविश्वास उंचावत असतो. व यातून नविन खेळाडू निर्माण होण्यास मदत मिळत असते असे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी यावेळी सांगितले.

सर्वोत्कृष्ट गोलंदाज व सर्वोत्कृष्ट फलंदाजास आकर्षक परितोषिक वितरण करण्यात आले. नंदिनी नगर संघाने दमदार कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावत ५५५५/- रोख रक्कम जिंकली. तर हिरावाडी क्रिकेट क्लब संघाने द्वितीय क्रमांक पटकावून ३३३३/- रोख रक्कम जिंकली. ब्लास्टर संघास तृतीय क्रमांकाचे २२२२/- रोख बक्षीस मिळाले आहे. तसेच सर्वोत्कृष्ट गोलंदाजाचे परितोषिक भूषण शिरसाठ यास तर सर्वोत्कृष्ट फलंदाजाचे परितोषिक जयेश पुरोहित यास वितरण आले आहे. हर्ष व्यास यास अष्टपैलूचे पारितोषिक देण्यात आले. अष्टविनायक ए, अष्टविनायक बी, हिरावाडी क्रिकेट क्लब, सिंग ११, मौनगिरी नगर मित्र मंडळ,, स्टेडियम A,  AK स्पोर्ट क्लब,  नंदिनी नगर, स्टेडियम B, शेरी मळा,  BAPS ब्लास्टर, T. N. M. M कमल नगर, W. C. C, सीता गुंफा या संघाने स्पर्धेत सहभाग नोंदविला होता. क्रिकेट स्पर्धेमध्ये भाग घेणाऱ्या प्रत्येक संघाला सन्मानचिन्ह व खेळाडूंना सन्मानपत्र देण्यात आले.

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांच्या पुढाकाराने प्रभाग प्रीमियर लीगची स्पर्धा घेण्यात आली. यावेळी वाळू शिंदे, पप्पू माने, शंतनू शिंदे, नंदू शिंदे, सचिन जाधव, नारायण बेंडकुळे, महेश निकम, अंतू मगर, प्रणित सानप, संजय दामोदरे, संदीप गांगुर्डे, संदीप खैरे, संग्राम राठोड, मुकेश शेवाळे, विनायक वाघ, मुन्ना वाघ, नाना तिदमे, अमित शेलार, राहुल भाग्यवंत, बदल कर्डक, हरिभाऊ वेळजाली, सुशांत कुऱ्हे, तुषार खैरे, रोहित जाधव, कौस्तुभ जथे, जॉनी सोळंकी, अशोक पाटील, प्रकाश आव्हाड, विनू जाधव, सागर पुरकर, शुभम पाटील, ओमकार पुरकर यांनी स्पर्धेच्या नियोजनाकरिता मेहनत घेतली.