बहुजन समाज पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदी अरुण काळे यांची नियुक्ती

???? सातपूर, नाशिक – बहुजन समाज पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीची विशेष बैठक नुकतीच शासकीय विश्रामगृह, नाशिक येथे पार पडली. या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय घेत बहुजन समाज पक्षाचे नाशिक जिल्हाध्यक्ष म्हणून अरुण काळे यांची निवड करण्यात आली.
या बैठकीमध्ये आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटन मजबूत करण्यावर भर देण्यात आला. श्री. काळे यांचा पक्षप्रेम, सामाजिक बांधिलकी आणि संघटन कौशल्य लक्षात घेता ही निवड करण्यात आली.
बैठकीस बहुजन समाज पार्टीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल डोंगरे , प्रदेश महासचिव मुकुंद सोनवणे ,उपाध्यक्ष हेमंत शिंदे, प्रदेश सरचिटणीस शांताराम गावडे, कार्याध्यक्ष राजू भोसले, तसेच पक्षाचे नाशिक जिल्हा, शहर व तालुका कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
???? नव्याने नियुक्त झालेले जिल्हाध्यक्ष अरुण काळे यांनी याप्रसंगी बोलताना सांगितले की, "नाशिक जिल्ह्यातील वंचित समाजासाठी न्याय आणि अधिकार मिळवून देणे हे माझे प्रमुख ध्येय असेल. पक्षसंघटना मजबूत करून आगामी निवडणुकांमध्ये बहुजन समाज पार्टीला यशस्वी करणे हे माझे लक्ष्य आहे."