आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठांचा नाशिकमध्ये १ मे रोजी सत्कार समारंभ

नाशिक, २९ एप्रिल – आंबेडकरी विचारधारेशी बांधिलकी जपत सामाजिक प्रश्नांवर ठामपणे भूमिका मांडणारे आणि आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते व विचारवंतांचा सत्कार १ मे २०२५ रोजी नाशिकमध्ये होणार आहे. सत्याग्रह भूमी प्रतिष्ठान, नाशिक यांच्या वतीने हा सत्कार समारंभ सायंकाळी ५ वाजता परशुराम साईखेडकर नाट्यगृहात आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आंबेडकरी विचारवंत, अभ्यासक, लेखक तसेच इंडियन डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. सुकुमार कांबळे असणार आहेत. पुणे येथील ज्येष्ठ पत्रकार, लेखक मा. संजय आवटे हे देखील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
सत्कारासाठी निवडण्यात आलेल्या मान्यवरांमध्ये अशोक दिवे , साराभाई वेळूंजकर , डॉ. भरत कारिया , विश्वनाथ काळे, दीपचंद दोंदे , उल्हास डांगळे , प्रताप काळे, विवेक गायकवाड, अरुण मोरे या मान्यवरांचा आणि मरणोत्तर सन्माना मध्ये बाळासाहेब तिगोटे , शंकरराव काकळीज , भिराज जाधव, श्याम काळे, मदन शिंदे आणि बबन जाधव यांचा कृतद्यनता सन्मान करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाचे आयोजन सत्याग्रह भूमी प्रतिष्ठान , मोठा राजवाडा , नाशिक यांनी केले असून शहरातील विविध सामाजिक कार्यकर्ते, संघटना व प्रतिष्ठित व्यक्तींनी संयोजनात सक्रिय सहभाग घेतला आहे. संयोजनात नितीन काळे, शरद काळे , केदारे , संजय तेजाळे , रविकिरण जाधव, धनंजय काळे, राजू भालेराव , गौतम निकम, दिलीप लिंगायत, विजय बागुल , अजय काळे, मंगल डांगळे व अविनाश तेजाळे यांचा समावेश आहे.
या समारंभास मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
कार्यक्रमाचे ठिकाण लोकेशन