शारीरिक आणि मानसिक संतुलनासाठी योगाभ्यासाची गरज:- बाळासाहेब क्षीरसागर

भौतिक सुखसोयी आणि चंगळवाद यांच्या पाठीमागे धावणाऱ्या माणसाला सातत्याने वाढत जाणा-या स्पर्धेला समोरे जावे लागते. त्यामुळे त्यांची मानसिक आणि शारीरिक स्थिती बिघडत आहे. परिणामी माणूस ताणवग्रस्त आणि चिंताग्रस्त बनून अनेक प्रकारच्या आजारपणात तो अडकला आहे, या नैराश्यग्रस्त आणि ताणवग्रस्त अवस्थेतून माणसाला सुस्थितीत येण्यासाठी योगाभ्यासाची नितांत गरज आहे. त्यायोगे माणसाचे मानसिक आणि शारीरिक संतुलन आबाधित राहील. कुटुंब आणि समाज व्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने शास्त्रशुद्ध योगासने करणे ही काळाची गरज बनत आहे. असे प्रतिपादन मविप्र समाजाचे सभापती बाळासाहेब क्षीरसागर यांनी केले.
मराठा विद्या प्रसारक समाजाचे, कर्मवीर गणपत दादा मोरे कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात आयोजित आंतरराष्ट्रीय जागतिक योगदिन कार्यक्रम प्रसंगी क्षीरसागर अध्यक्ष म्हणून बोलत होते. यावेळी प्राचार्य डाॅ. ज्ञानोबा ढगे, योगप्रशिक्षक कु. गायत्री सोनवणे, डॉ. प्रवीण ढेपले, प्रा.अभय वडघुले, डॉ. सुसान लॉरेनसिया, प्रा. योगेश कडलग, शा. शि. संचालक प्रा.चंद्रशेखर मोरे प्रा.चेतन कुंदे, सर्व प्राध्यापक, प्राध्यापिका उपस्थित होते.
पुढे सभापती क्षीरसागर म्हणाले की, पूर्वी कुठलेही आधुनिक दवाखाने व औषधोपचार उपलब्ध नसताना देखील आपले पूर्वज शास्त्रशुद्ध योग अभ्यास, व्यायाम व आयुर्वेद याचा वापर करत दीर्घ व निरोगी आयुष्य जगले, ही आपल्या पूर्वजांची शिदोरी व त्यांच्या अनुभवी ज्ञानाचे आचरण आपण स्वतः करून ते नव्या पिढीपर्यंत पोहोचविल्यास नवी पिढी सक्षम होण्यास मोठी मदत होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
प्रास्तविकात प्राचार्य डॉ. ज्ञानोबा ढगे यांनी निफाड महाविद्यालयातील क्रीडा, एनएसएस व एनसीसी आणि इतर विभागांमार्फत राबविणे जाणारे उत्कृष्ट उपक्रम याची माहिती देत, योगासनांचे हेतू व उद्देश विशद करून त्याचे महत्त्व पटवून दिले.
या कार्यक्रमाची सुरूवात मान्यवरांच्या शुभहस्ते सरस्वती प्रतिमापूजनाने करण्यात आली.
यावेळी स्वतः सभापती बाळासाहेब क्षीरसागर यांनी महाविद्यालयातील सर्वांसोबत पूर्णवेळ उपस्थित राहून योगासनांचे सर्व प्रकार सर्वांसोबत केले आणि सर्वांना आपल्या कृतीतून योगाभ्यासाचे महत्त्व पटवून देत सर्वांना एक नवी ऊर्जा व प्रेरणा देण्याचे मौलिक काम आपल्या कृतियुक्त योगासानातून केले.
महाविद्यालयाच्या वतीने ०७ जून ते २० जून यादरम्यान सर्व विद्यार्थ्यासाठी ऑनलाईन पद्धतीने योग प्रशिक्षण शिबिराचे आयोजित करण्यात आले होते.
योग प्रशिक्षक गायत्री सोनवणे व चंद्रशेखर मोरे यांनी योग प्रकारांची प्रात्यक्षिके केली .
कार्यक्रमाचे संयोजन आणि सूत्रसंचालन डॉ. महेश बनकर यांनी केले तर आभार प्रा. अभय वडघुले यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वीततेसाठी प्रा. चेतन कुंदे, प्रा.प्रवीण शेळके, प्रा.शंकर गायकवाड, प्रा.भाऊसाहेब मुंतोडे व सर्व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.
या योग दिवसासाठी सर्व प्राध्यापक व एन.एस.एस. आणि एन.सी.सी चे विद्यार्थी उपस्थित होते