सप्तशृंगी महाविद्यालयात जागतिक पर्यावरण दिन साजरा

सप्तशृंगी महाविद्यालयात जागतिक पर्यावरण दिन साजरा

तुळजाभवानी एज्युकेशन सोशल अँड वेल्फेअर सोसायटी संचलित श्री सप्तशृंगी कला, वाणिज्यव विज्ञान महाविद्यालय डांगसौंदाणे येथे जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला, जागतिक पर्यावरण दिनानिमित्त महाविद्यालयातच्या आवारात प्लास्टिक वेचून स्वच्छता करण्यात आली 'एक पेड माँ के नाम' या उपक्रमांतर्गत महाविद्यालयाच्या आवारात विविध झाडांची लागण करण्यात आली, ह्या कार्यक्रम प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य जाधव पी.एम व राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी प्रा. आर. डी. नाडेकर हजर होते. 

  'हा दिवस पर्यावरणाच्या संरक्षणासाठी जागरूकता वाढवण्यासाठी आणि पर्यावरणीय समस्यांबद्दल जनजागृती करण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे'. असे प्रतिपादन प्राचार्य जाधव यांनी केले.

ह्या कार्यक्रमासाठी प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी स्वयंसेवक हजर होते.