डॉक्टर शहाणे बंधूंच्या पुस्तकाचे अमेरिकेतील खासदार डॉ. ठाणेदार यांच्या हस्ते प्रकाशन

डॉक्टर शहाणे बंधूंच्या पुस्तकाचे अमेरिकेतील खासदार डॉ. ठाणेदार यांच्या हस्ते प्रकाशन

नाशिक (प्रतिनिधी) डॉ.राजेंद्र शहाणे आणि डॉ. कृष्णा शहाणे लिखित "व्यापार चक्रे आणि स्थिरीकरणाची धोरणे" या पुस्तकाचे प्रकाशन अमेरिकेतील विद्यमान खासदार (काँग्रेसमन) डॉ. श्रीनिवास ठाणेदार यांच्या हस्ते झाले.

              प्रा . डॉ. राजेंद्र शहाणे आणि प्रा. डॉ. कृष्णा शहाणे यांनी लिहिलेल्या "व्यापार चक्रे आणि स्थिरीकारणाची धोरणे"  या एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठ मुंबई यांनी तृतीय वर्ष कला या वर्गासाठी मराठी माध्यमातून प्रसिद्ध केलेल्या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ दि. २६ रोजी हॉटेल पंचवटी यात्री येथील एका खास समारंभात झाला. खासदार ठाणेदार यांनी याप्रसंगी डॉक्टर शहाणे बंधूंचे अभिनंदन करून त्यांना पुढील लिखाणासाठी शुभेच्छा दिल्या.

                खासदार (काँग्रेसमन) डॉ.ठाणेदार हे अमेरिकेच्या निशिगन मतदार संघाचे डेमोक्रॅटिक पक्षाचे विद्यमान खासदार  असून ते अमेरिकेतील एक उद्योजक तसेच लेखक म्हणून देखील परिचित आहेत. याप्रसंगी खासदार डॉक्टर ठाणेदार, प्राचार्य डॉ.कृष्णा शहाणे वसंत व्याख्यानमालेचे अध्यक्ष श्रीकांत बेनी हे व्यासपीठावर उपस्थित होते.

             प्रा.डॉ. कृष्णा शहाणे हे अर्थशास्त्राचे प्राध्यापक असून गोखले एज्युकेशन सोसायटी संचलित बिटको महाविद्यालय नाशिक रोड येथे प्रभारी प्राचार्य आहेत तर त्याचे बंधू प्रा. डॉ. राजेंद्र शहाणे हे बी.वाय.के. महाविद्यालयात अर्थशास्त्राचे प्राध्यापक आहेत. 

                 डॉक्टर शहाणे बंधू यांनी लिहिलेल्या तेराव्या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभ प्रसंगी प्रा. डॉ. राजेंद्र शहाणे, वसंत व्याख्यान मालेचे अध्यक्ष श्रीकांत बेनी, सेक्रेटरी हेमंत देवरे, खजिनदार अविनाश वाळुंजे, अध्यक्ष प्राचार्य संगीता बाफना, नाशिक मनपाचे जेष्ठ नगरसेवक गुरमीत सिंग बग्गा, जेष्ठ पत्रकार सुरेश भटेवरा, सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक मंडलेश्वर काळे, अरुण नेवासकर, डॉ. प्रदीप पवार, डॉ. अतुल वडगावकर, डॉ. उमेश मराठे, वैद्य विक्रांत जाधव, वसंतराव खैरनार, जयंत जातेगावकर, दीपक बागड, प्रा जयंत भातंबरेकर, अमृता पवार, मुक्तेश्वर मुनशेट्टीवार, पुष्कर वैशंपायन, विनय कुलकर्णी,  सेवानिवृत्त पोलीस अधीक्षक नवलनाथ तांबे, मनीष सानप, कांतीलाल तातेड, विजय काकड, अशोक महाजन, गणेश भोरे, राजेंद्र शेळके, सुनील गायकवाड, रमेश खापरे, अशोक तांबे आदींसह नाशिक शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.