बिटको महाविद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी..

दि. १० जुलै २०२५ नाशिकरोड :- " प्रत्येक वेळी सातत्याने मार्गदर्शन, संस्कार व आपल्या कामांना प्रेरणा देणाऱ्या गुरुचे आपल्या दैनंदिन जीवनात योगदान मोलाचे आहे. गुरु म्हणजे प्रत्येक अनुभवात प्रत्येक क्षणात भेटणारा एक दिव्य आत्मप्रकाश असतो. जो नियमित साधना करतो तोच यशाचा वारस ठरतो , " असे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. कृष्णा शहाणे यांनी केले.
गोखले एज्युकेशन सोसायटीच्या नाशिकरोड येथील बिटको महाविद्यालयात कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आयोजित केलेल्या गुरुपौर्णिमेप्रसंगी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. कृष्णा शहाणे अध्यक्षस्थानी होते. त्यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. याप्रसंगी, उपप्राचार्य डॉ. अनिलकुमार पठारे, डॉ. सतीश चव्हाण, कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्या रागिणी भवर , पर्यवेक्षिका प्रणाली पाथरे, कार्यक्रमाच्या संयोजिका मीना शिंदे, संजीवनी निजामपूरकर, विद्यार्थी सभा कार्याध्यक्ष सुहास माळवे, सांस्कृतिक विभाग प्रमुख संजय परमसागर, डॉ. साहेबराव निकम, राधा पाटील, मीनल पाटील यासह नीलिमा कुलकर्णी, एम. ए. कुटे, किरण पाटील तसेच कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते .
विद्यार्थ्यांमध्ये संस्कार मूल्य रुजवणाऱ्या व त्यांच्यामध्ये जिज्ञासूवृत्ती जोपासणाऱ्या शिक्षकांना यावेळी गुरुपौर्णिमेनिमित्त हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या . याप्रसंगी महाविद्यालयाच्या उपप्राचार्या रागिनी भवर आणि पर्यवेक्षिका प्रणाली पाथरे यांनी विद्यार्थ्यांना यथोचित मार्गदर्शन करतांना गुरूंच्या कृपाप्रसादामुळेच आयुष्य जगण्याला खरा अर्थ मिळतो. गुरुपौर्णिमा कृतज्ञता श्रद्धा आणि विनम्रता यांचे प्रतीक आहेअसे सांगितले . कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनीही यावेळी शिक्षकांना गुलाबपुष्प व पेन भेट देऊन शिक्षकांप्रति आदरभाव व्यक्त केला .यात कस्तुरी देवरे, समीक्षा सोनवणे, नियती उगले, आयुषी केला, मालविका नायर, ईशान आठवले, चिरंजीव शेरकर, श्रेया शर्मा, वितीषा पगारे, तपस्वी पगारे, कृष्णा शिरसाठ, रोशन कुशारे, निखिल डहाळे, श्रीराज ढवळे यांनी आपल्या भावना शब्दात व्यक्त केल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रस्ताविक तपस्वी पगारे हीने केले तर आभार मालविका नायर हिने मानले. भूगोल विभागातही शिक्षक दिन विद्यार्थ्यांनी साजरा केला .