कर्मवीर गणपत दादा मोरे निफाड महाविद्यालयात प्लास्टिक बॅग मुक्ती दिन साजरा

कर्मवीर गणपत दादा मोरे निफाड महाविद्यालयात प्लास्टिक बॅग मुक्ती दिन साजरा

प्लास्टिक बॅग  पर्यावरणासाठी हानिकारक आहे. प्लास्टिक हे दीर्घकाळ टिकते.प्लास्टिक मधून निघणारे सूक्ष्म कण  अत्यंत धोकादायक  असून मानवासहित सर्व जीवसृष्टीसाठी अपायकारक आहे. म्हणून प्रत्येकाने  प्लास्टिक ऐवजी कागदी आणि कापडी पिशव्यांचा  वापर करावा.असे प्राचार्य डॉ ज्ञानोबा ढगे यांनी  प्रतिपादन केले. मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या निफाड येथे कर्मवीर गणपत दादा मोरे महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना आणि राष्ट्रीय छात्र सेना यांच्यावतीने ३ जुलै आंतरराष्ट्रीय प्लास्टिक बॅग मुक्ती दिन साजरा करण्यात आला त्या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर उपप्राचार्य अभय वडघुलेप्रा भाऊसाहेब मुन्तोंडे,प्रा शंकर गायकवाड प्रा प्रकाश आहेर  प्रा मनीषा कोटकर आदि उपस्थित होते. 

प्राचार्य डॉ ज्ञानोबा ढगे पुढे म्हणाले कि विद्यार्थ्यांनी आपल्या घरी प्लास्टिक बॅग मुक्तीची संकल्पना राबवून आजूबाजूच्या परिसरात देखील याबाबत जनजागृती करावी. यावेळी विद्यार्थ्यांना प्लास्टिक बॅग मुक्ती शपथ देण्यात आली