के व्हि एंन नाईक महविद्यालय सिन्नर येथे माजी विद्यार्थी मेळावा संपन्न

के व्हि एंन नाईक महविद्यालय सिन्नर येथे माजी विद्यार्थी मेळावा संपन्न

क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण प्रसारक संस्थेचे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सिन्नर येथे माजी विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संचालक समाधान गायकवाड हे होते सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर पखाले यांनी केले. महाविद्यालयातील माजी विद्यार्थ्यांसोबत असणारे संबंध नेहमीच अतूट राहिलेले आहे. व ते यापुढे देखील असेच राहतील असे मत डॉक्टर किशोर पखाले यांनी मांडले. तर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे यश हे महाविद्यालयासाठी अतिशय महत्त्वाची बाब असून के. व्ही. एन. नाईक महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनी भविष्यात आणखी प्रगती करावी यासाठी संस्थेचे संचालक समाधान गायकवाड यांनी शुभेच्छा दिल्या.

माजी विद्यार्थी मेळाव्यासाठी उपस्थित विद्यार्थ्यांनी देखील महाविद्यालबद्दल आपल्या असणाऱ्या आठवणी या कार्यक्रमाच्या निमित्ताने जागृत केल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी डॉ. मंगल सांगळे यांनी केले. या प्रसंगी महाविद्यालयातील परीक्षा विभाग प्रमुख प्रा. संतोष आव्हाड, विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. ज्योती गायकवाड, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्राध्यापक पूनम कुटे तसेच चंद्रशेखर तवसाळकर, सामाजिक कार्यकर्ते विजय कदम, शिवाजी जाधव व कौशल्य विकास केंद्राचे समन्वयक ज्ञानेश्वर पवार, IQAC कॉर्डिनेटर ज्ञानेश्वर चकोर आदी मान्यवर इतर प्राध्यापक, विद्यार्थी व प्राध्यापके तर कर्मचारी उपस्थित होते.