भारतीय युवकांनी वैश्विक अर्थसत्ता काबीज करावी. प्रा हेमंत कांबळे

भारतीय युवकांनी वैश्विक अर्थसत्ता  काबीज करावी. प्रा हेमंत कांबळे
भारतीय युवकांनी वैश्विक अर्थसत्ता  काबीज करावी. प्रा हेमंत कांबळे

 दे.कॅम्प येथील मविप्र समाजाचे श्रीमती विमलाबेन खिमजी तेजुकाया कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या अर्थशास्त्र विभागाने जागतिक लोकसंख्या दिनानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात प्रमुख अतिथी प्रा. हेमंत कांबळे यांनी  देशातील युवकांनी जागतिक महासत्तेमध्ये उतरून माहिती  तंत्रज्ञानाचा उपयोग करून संधीचे सोने करावे असे प्रतिपादन केले. जागतिक पातळीवर व्यावसायिक प्रशिक्षण घ्यावे, उद्योग क्षेत्रामध्ये नवनवीन क्षेत्र काबीज करावी.  भारतीय तरुणांनी जागतिक पातळीवर आपले अस्तित्व निर्माण करावे वेगवेगळ्या उद्योग क्षेत्रामध्ये नावलौकिक कमवावा त्यासाठी आवश्यक असणारे ज्ञान स्वतःमध्ये अवगत करावे असे प्रतिपादन त्यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. एस. एस.काळे होते. व्यासपीठावर डॉ. एस. के. शिंदे उपप्राचार्य व मविप्र सेवक संचालक उपप्राचार्य डी.टी. जाधव  डॉ.जयश्री जाधव हे होते. प्रा.हेमंत कांबळे यांनी लोकसंख्या दिन का साजरा केला जातो हे स्पष्ट केले. त्याचबरोबर देशातील तरुणांनी जागतिक पातळीवर आपले वर्चस्व निर्माण करावे. अतिरिक्त लोकसंख्येची विभागणी करण्यासाठी शासनाचे धोरण आहेच त्यासाठी युवकांनी आपले ज्ञान वाढवून जगातील विविध क्षेत्रात कर्तृत्व सिद्ध करावे असे सांगितले. अध्यक्षीय मनोगतात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एस. काळे म्हणाले की, भारतीय युवकांनी जगातील वेगवेगळ्या देशात स्वतःच्या ज्ञानावर कार्य करून देशाचे नाव उज्वल करावे. तंत्रज्ञानाच्या युगात युवकांना प्रचंड संधी असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. जयश्री जाधव अर्थशास्त्र विभाग प्रमुख यांनी केले. पाहुण्यांचा परिचय डॉ. दिलीप बेहेरे, सूत्रसंचालन डॉ.मनिषा आहेर व आभार डॉ. रेखा जाधव यांनी मानले. यावेळी पत्रकार श्री प्रशांत दिवंदे आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री. मोरे,श्री. बाळासाहेब पवार, श्री. कोळी उपस्थित होते.