जिल्हास्तरीय सांस्कृतिक स्पर्धेत महाविद्यालयीन तरुणांचे कलाविष्कार सादर

जिल्हास्तरीय सांस्कृतिक स्पर्धेत महाविद्यालयीन तरुणांचे कलाविष्कार सादर

सिडको - येथील म वि प्र समाजाचे कर्मवीर शांताराम कोंडाजी वावरे कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, राष्ट्रीय सेवा योजना विभाग व विद्यार्थी विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय सांस्कृतिक स्पर्धा 2024 उत्साहात संपन्न झाल्या.

 नाशिक जिल्ह्यातील विविध एकुण 75 महाविद्यालयांनी काव्य वाचन, वकृत्व, पोवाडा गायन, पोस्टर, निबंध आणि पथनाट्य स्पर्धांमध्ये सहभाग नोंदविला. यानिमित्ताने महाविद्यालयीन तरुणाईचा कलाविष्कार बहरून आला, या कलाविष्कार प्रकारामध्ये सामाजिक समस्यांवर आधारित पोवाडा गायन, सामाजिक आशयावर स्वरचित कविता, ताणतणाव मुक्त जीवन : मिथक कि वास्तव?, योग, अवयवदान व व्यसनाधीनता अशा विषयांवर निबंध व पोस्टर स्पर्धा, अलिकडचे विषय स्त्री अत्याचार की लिंगभेद संवेदीकरण, व्यसन आणि तरुण, महाविद्यालयीन युवक व ताणतणाव अशा विविध विषयांवर पथनाट्य सादर केली.

जिल्हास्तरीय सांस्कृतिक स्पर्धा उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी शिवाजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ बाबासाहेब आंबेडकर आदी महापुरुषांनी स्पर्धा ही संधी मानून समाज हित हा एक नवा आदर्श भावी पिढीसमोर ठेवला आहे असे मत कार्यक्रमाचे उद्घाटक सुप्रसिद्ध शिवव्याख्याते व शाहीर मा.श्री.समाधान हेगडेपाटील यांनी व्यक्त केले.

       महाविद्यालयीन युवकांचे व्यक्तिमत्त्व हे सांस्कृतिक स्पर्धांतून घडत असते म्हणून विद्यार्थ्यांनी स्पर्धांना एक यशाची संधी मानून सतत प्रयत्न केले पाहिजे असे प्रतिपादन कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ एस के कुशारे यांनी केले.

उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा समन्वयक डॉ डी के आहेर, डॉ गोरक्षनाथ पिंगळे, उपप्राचार्य प्रा एस टी घुले, डॉ डी एन पवार, डॉ मिलिंद थोरात विविध स्पर्धांचे परीक्षक म्हणून डॉ सुरेखा बोराडे, डॉ सविता आहेर, डॉ दीपा कुचेकर, डॉ सायली आचार्य, श्री हेमंत संगमनेरे, श्री पी बी शिंदे, श्री कृष्णा जाधव तसेच विविध महाविद्यालयातून एकूण 557 स्पर्धक व कार्यक्रम अधिकारी  उपस्थित होते. 

        कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा समन्वयक डॉ रविंद्र आहिरे, सूत्रसंचालन प्रा वर्षा शिरोरे व आभार प्रा शुभम गव्हाणे यांनी मानले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ सुरेखा जाधव, डॉ मनीषा नाठे, डॉ प्रणाली जाधव, प्रा सपना बेडसे, प्रा जिजा गोसावी, डॉ अश्विनी कदम, डॉ गीता परमार, डॉ विठ्ठल अनवट, प्रा भास्कर बोडके, श्री वैभव खडांगळे, श्री सोपान बिडगर महाविद्यालयातील सहकारी प्राध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सहकार्य लाभले.