विद्यार्थ्यांनी करिअर करताना ए आणि बी प्लॅन तयार ठेवावा. विद्यार्थ्यांनी कौशल्य आधारित शिक्षणावर भर देऊन स्वतःला सिद्ध करावे.

विद्यार्थ्यांनी करिअर करताना ए आणि बी प्लॅन तयार ठेवावा. विद्यार्थ्यांनी कौशल्य आधारित शिक्षणावर भर देऊन स्वतःला सिद्ध करावे.
पिंपळगाव बसवंत 3.8.2024
आज शिक्षणात विद्यार्थ्यांना विविधांगी शिक्षणाच्या शाखा उपलब्ध झाल्या आहे. विद्यार्थ्यांच्या अंगभूत असलेल्या जिद्द, चिकाटी व मेहनतीला दिशा व योग्य मार्गदर्शन यांची जोड मिळाल्यास यश मिळविणे अधिक सोपे आहे. विद्यार्थ्यांनी गुणात्मक स्पर्धेमध्ये कौशल्य आधारित शिक्षणावर लक्ष केंद्रित करून व्यावसायिक शिक्षण निवडावे. विद्यार्थ्यांना आपले करिअरचे ध्येय निश्चित करणे व पण त्यासोबत ए.बी.सी.डी. प्लॅन सुद्धा तयार ठेवावा असे प्रतिपादन माजी विद्यार्थी तथा करिअर कौन्सिलर प्रा. मंगेश निकम यांनी केले. मराठा विद्या प्रसारक समाज,नाशिक संचलित कर्मवीर काकासाहेब वाघ कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय, पिंपळगाव बसवंत येथे आयोजित विद्यार्थी व पालक मेळाव्याला ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर व्यासपीठावर स्थानिक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रवींद्र मोरे, प्राचार्य डॉ. ज्ञानोबा ढगे, उपप्राचार्य दिलीप माळोदे, प्रा. यशवंत शिरसाठ, सुनील सोनवणे आदी उपस्थित होते. 
प्रा. मंगेश निकम पुढे म्हणाले, शिक्षणातील विविध विषयांचे मार्गदर्शन करताना सायन्स विभागातील विद्यार्थ्यांना बारावी नंतरच्या विविध प्रवेश परीक्षा, ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया, शासनातर्फे देण्यात येणाऱ्या सर्व स्कॉलरशिप योजना, व्यावसायिक शिक्षण, आधुनिक शिक्षण पद्धती अशा विविध विषयांवर सविस्तर माहिती दिली. यामध्ये  State CET Counseling, JOSAA Counseling, CSAB Counseling, Medical Counseling, BITs Counseling, COMEDK Counseling, Architecture & HMCT Counseling, NDA, Design, Law, Agri, Planning, Pharmacy, Engineering अशा विविध व्यावसायिक कोर्सच्या प्रवेश प्रक्रियेविषयी सविस्तर माहिती दिली.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ज्ञानोबा ढगे यांनी मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, विद्यार्थी पालक मेळाव्यातून पालकांना मुलांच्या करियर विषयी असणारा समस्या यांचे निराकरण होण्यास यातून मदत होते. ग्रामीण भागातील पालकांना शिक्षणाविषयी माहिती कमी असते अशा कार्यक्रमातून करीयरच्या समस्यांचे निराकरण होण्यास मदत होते अशी माहिती दिली.

अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्रा. रवींद्र मोरे म्हणाले की, आज शहरी किंवा ग्रामीण विद्यार्थी असा काही भेद राहिलेला नाही. आज करियर संदर्भात विविध माहितीचे स्रोत निर्माण झाले आहे त्याचा विद्यार्थ्यांनी उपयोग करून घ्यावा. आज विद्यार्थी पालक यांच्यात संवाद कमी होत आहे तो होत राहिला पाहिजे असे विचार व्यक्त केले. 
प्रास्ताविकात उपप्राचार्य प्रा. दिलीप माळोदे यांनी महाविद्यालयात विज्ञान  विभागातील  विद्यार्थांसाठी शैक्षणिक स्तरावर विद्यार्थांच्या प्रगतीसाठी व गुणवत्ता वाढीसाठी विविध प्रकारे उपक्रम राबिवले जातात सखोल माहिती दिली. 
यावेळी विशेष नैपुण्य मिळालेल्या विद्यार्थ्यांमध्ये कु.आकाश घुमरे, कुमारी हर्षदा पवार, कु. संस्कृती वारेकर व कु. प्रेम जाधव यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रा. अजित देशमुख यांनी केले तर प्रा. यशवंत शिरसाठ यांनी आभार मानले. 
यावेळी पालक मेळाव्यास विद्यार्थी पालक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीसाठी सर्व प्राध्यापक व प्राध्यापिका या सर्वांनी विशेष परिश्रम घेतले.