नाशिकरोड़: दिवाळी म्हटली की आपण स्वतःच्या घराची साफसफाई आणि पणत्यांचा लखलखाट करण्यासाठी सज्ज होतो पण जुन्या मंदिरांचं काय? याचा विचार आपण कधी करत नाही याच अनुषंगाने वडनेर दुमाला येथे दीपावली सणाचे औचित्य साधून 'एक घर एक पणती आणि ती फक्त मंदिरासाठी' हा अभिनव उपक्रम राबवण्यात आला प्रत्येक घरातून संकलित केलेली पणती परिसरातील पुरातन मंदिरे व छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे प्रज्वलित करून गावाची शोभा वाढवण्यात आली,तसेच मंदिरांची शोभा वाढविण्यात आली.संपूर्ण मंदिर परिसर पणत्यांच्या प्रकाशाने लखलखून गेला होता सोबतच फटाक्यांची आतिषबाजी हे सर्वच प्रकार डोळ्यांचे पारणे फेडणारे ठरले.
शिवसेना उपजिल्हाप्रमुख मा.श्री केशव पोरजे यांच्या संकल्पनेतून गुरुवारी दिनांक (31) सायंकाळी लक्ष्मीपूजनाच्या पूर्वसंध्येला हनुमान मंदिर, विठ्ठल रुक्मिणी मंदिर, निळकंठेश्वर महादेव मंदिर, वारकरी चौक, भैरवनाथ मंदिर, प्राचीन श्री सिद्धेश्वर महादेव मंदिर, वक्रतुंड गणेश मंदिर, बौद्ध विहार आणि मरीआई माता मंदिर आधी प्राचीन ठेवा जपलेल्या मंदिरात 13000 हून अधिक पणत्या प्रज्वलित करण्यात आल्या.मंदिराच्या परिसरात पणत्यांच्या रोशनाईमुळे सुंदर दृश्य डोळ्यांना बघायला मिळत होते आणि ते डोळ्यात साठवण्यासारखे होते. यावेळी गावातील दत्तात्रय पाळदे, वाळू पोरजे, सुरेश पोरजे बाजीराव पोरजे, अरुण गडकर, संतोष पोरजे, मोरेश्वर बैरागी आदी सह ग्रामस्थ आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.