सिन्नर महाविद्यालयात 'आंतरराष्ट्रीय योग दिन' मोठ्या उत्साहात साजरा

सिन्नर  महाविद्यालयात 'आंतरराष्ट्रीय योग दिन' मोठ्या उत्साहात साजरा

क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण प्रसारक संस्थेचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सिन्नर राष्ट्रीय सेवा योजना विभाग व वेदा केअर सेंटर सिन्नर तसेच  यांच्या संयुक्त विद्यमाने 'आंतरराष्ट्रीय योग दिन' मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या पहिल्या सत्रात उदघाटक म्हणून संस्थेचे संचालक समाधान गायकवाड उपस्थित होते. तसेच योग प्रशिक्षक मंगल दिघे मॅडम व त्यांची संपूर्ण टीम उपस्थित होती. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर पखाले हे अध्यक्षस्थानी होते. योग प्रशिक्षक मंगल दिघे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली विविध योगासने करण्यात आली. यावेळी ३०० हून अधिक विद्यार्थ्यांनी सदर योग सत्रात सहभाग नोंदवला. 

त्यानंतर समारोपाच्या दुसऱ्या सत्रात अध्यक्षस्थानी के. व्ही. एन. नाईक संस्थेचे संचालक  जयंत बाबू आव्हाड होते. तसेच प्रमुख अतिथी म्हणून भा. ज. पा. सिन्नर तालुका अध्यक्ष सजन सांगळे उपस्थित होते. तसेच वेदा केअर सेंटरचे मिननाथ कांडेकर, ज्योती कांडेकर, नितीन अढांगळे, सह्याद्री करिअर अकॅडमीचे संचालक गोकुळ आंधळे आदि मान्यवर उपस्थित होते. योग दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात सहभागी संस्थांचा व विद्यार्थ्यांचा वेदा केअर सेंटरच्या वतीने प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. 'योग हा केवळ योग दिनापूरता मर्यादित न ठेवता त्याची साधना करणे गरजेचे असल्याचे संचालक समाधान गायकवाड यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले. तसेच 'योग करणे व मनःशांती मिळविण्यासाठी योग करणे गरजेचे असल्याचे कार्यक्रमाचे अध्यक्ष व संस्थेचे संचालक जयंत बाबू आव्हाड यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले. यावेळी महाविद्यालयातील सर्व विभाग प्रमुख, प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी, राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

कार्यक्रमात सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी डॉ. मंगल सांगळे व प्राध्यापिका अपर्णा थोरात यांनी केले.