सायखेडा महाविद्यालयात इंटरनॅशनल एड्स डे निमित्त प्राध्यापक डॉ. सचिन गुरुळे यांचे व्याख्यान संपन्न.

सायखेडा महाविद्यालयात इंटरनॅशनल एड्स डे निमित्त प्राध्यापक डॉ. सचिन गुरुळे यांचे व्याख्यान संपन्न.

जगभरात दरवर्षी 1 डिसेंबरला ‘जागतिक एड्स दिन’ साजरा केला जातो. एड्स हा एक गंभीर आजार आहे. हा एक संक्रमित आजार असून या आजारामुळे जगभरात आतापर्यंत लाखो रूग्णांनी जीव गमावला आहे. ह्यूमन इम्युनो डेफिशिंयन्सी व्हायरस( HIV) मुळे होणाऱ्या एक्वायर्ड इम्युन डेफिशीयन्सी सिंड्रोम( AIDS) या गंभीर आजाराबद्दल जगभरात जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि या आजाराने पीडित असलेल्या व्यक्तींना पाठिंबा दर्शविण्यासाठी आणि समर्थन देण्यासाठी दरवर्षी 1 डिसेंबर हा दिवस "जागतिक एड्स दिन" म्हणून साजरा केला जातो. एड्स या आजारासंदर्भात सर्व प्रकारच्या वयोगटातील लोकांनी जागरूकता निर्माण करणे हा या दिनाचा मुख्य हेतू आहे असे प्रतिपादन डॉ. सचिन गुरुळे यांनी केले.

               मागील कित्येक वर्षांपासून जागतिक एड्स दिन हा साजरा केला जात आहे. एड्स हा एक गंभीर आजार आहे. अशा परिस्थितीमध्ये या आजाराबाबत सर्वांना जागरूक करण्यासाठी हा दिवस जगभरात साजरा केला जातो.जगभरातून या आजाराचे समूळ नष्ट करणे हा या दिनाचा मुख्य उद्देश आहे. तसेच, या आजारामुळे होणारे मृत्यू रोखणे आणि या आजाराने ग्रस्त असलेल्या पीडितांना योग्य उपचार देणे महत्वाचे आहे असे कार्यक्रमाच्या अध्यक्षीय मनोगतात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. ए. खैरनार यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय स्वयंसेवक योजना प्रमुख अभिन पोटे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापिका एस.एम. गायकवाड यांनी केले तर आभार प्राध्यापिका पी.बी.बागल यांनी मानले. प्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.एस.व्ही.गोसावी , डॉ. डी. डी. काजळे, प्राध्यापक शशिकांत मोगल, डॉ. रेखा मोरे व  प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.