विश्व वंदनीय महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती निमित्त आयोजित प्रदर्शनाचा समारोप

विश्व वंदनीय महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती निमित्त  आयोजित प्रदर्शनाचा समारोप

एस.सी./एस.टी./ओ.बी.सी अँड मायनॉरिटीज वेल्फेअर असोसिएशन आय.एस.पी./सी.एन.पी च्यावतीने नाशिकरोड येथे विश्व वंदनीय, कायदेतज्ञ डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीदिनाचे औचित्य साधत महामानव बाबासाहेबांनी त्यांच्या दैनदिन जीवनात वापरलेल्या वस्तूंच्या प्रदर्शनाच्या समारोपप्रसंगी एस.पी.एम.सी.आय.एल.चे मुख्य व्यवस्थापकीय संचालक मा.विजयरंजन सिंग साहेब व  सीएनपीचे मुख्य महाप्रबंधक डॉक्टर डी.के.रथ साहेब हे उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते समारोपाप्रसंगी डॉ.बाबासाहेब आंबेडकर,छत्रपती शिवाजी महाराज,महात्मा ज्योतिराव फुले यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करण्यात आले.

 संस्थेचे जनरल सेक्रेटरी विकासजी बर्वे, कार्याध्यक्ष  नितीनजी तेजाळे यांनी मान्यवरांना भारतीय संविधानाची प्रत,डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा भेट देऊन सन्मान केला. तसेच एस.पी.एम.सी.आय.एल.च्या बाकी युनिट पैकी नाशिक असोसिएशनच्या माध्यमातून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या वाचन संस्कृतीवर अविस्मरणीय व ऐतिहासिक असा देखावा सादर केल्याबद्दल साहेबांनी सर्व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. प्रदर्शनातील डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतः वापरलेल्या विविध वस्तू प्रत्यक्ष बघणं हे मी माझे भाग्यच समजतो असे गौरवउद्गार साहेबांनी  काढले.

या कार्यक्रमाच्या समारोपाप्रसंगी महेंद्र चव्हाण,सुधीर गायकवाड,दिपक नाईकवाडे, सचिन कांबळे,धनंजय काळे, देविदास साळवे,सुनील रायकर,शरद धांडे,संतोष गांगुर्डे,रोहित कानडे,सुनील शेजवळ, प्रवीण जाधव,विजय भालेराव,लक्ष्मीकांत लोहारकर, शैलेश उदावंत विविध संस्था संघटनांचे पदाधिकारी, प्रेसचे अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.प्रदर्शनाबद्दल माहिती मोहन रावळे यांनी दिली.