संविधान कराओके क्लब प्रस्तुत दिवाळी पहाट पाडव्यात सांगितिक मेजवानीत रसिक दंग

संविधान कराओके क्लब प्रस्तुत दिवाळी पहाट पाडव्यात सांगितिक मेजवानीत रसिक दंग

नाशिकरोड : आनंद  उत्तम  मित्र परिवार  आयोजीत , संविधान  कराओके ग्रुप  प्रस्तुत, 

दिवाळी  पाडव्या  निमित्त 

सदाबहार सुमधुर मराठी, हिंदी गीतांची संगितमय  पाडवा पहाट कार्यक्रम विकास मंदीर शाळा , दत्तमंदिररोड नाशिकरोड येथे उत्साहात सम्पन्न झाला . या संगीतमय मैफिलीत नाशिकरोडचे संविधान ग्रुपचे कलाकार गाणी सादर  केली . यात उत्तम जाधव, मायकल खरात,रुपाली तायडे, मीना पाठक, संजय परमसागर,रितिका गायकवाड, वनिता आहेर, विनोद गोसावी, सुहास माळवे,अशोक महाजन, अनुपमा क्षीरसागर, सविता सहानी, राधिका गांगुर्डे,  रमाकांत गायकवाड या गायकांनी  प्रथम नमो गौतमा, ओंकार प्रधान, कानडा  राजा पंढरीचा, ओ कान्हा अब तो मुरली, मला हे दत्तगुरु दिसले, सुर तेच छेडीता, गेला हरी कुण्या गावा, चाफा बोलेना, अवघे गर्जे पंढरपूर, दिवस तुझे हे फुलायचे , भातुकलीच्या खेळामधली, तोच चंद्रमा नभात, पाहिले ना मी तुला अशी एक से एक विविध गीते सादर केली. या गाण्यांचा आनंद  घेत रसिकांनी  मोठ्या संख्येने उपस्थित राहून उस्फुर्त दाद दिली . त्यासाठी आनंद उत्तम मित्र परिवारचे संस्थापक उत्तम पवार, अध्यक्ष ज्ञानेश्वर ठाकरे,  कार्याध्यक्ष दिलीप पाटील, सल्लागार अँड .वसंत पेखळे, गायक उत्तम सोनकांबळे, कल्पना सोनकांबळे  यासह संविधान कराओके क्लबचे  संचालक राजन गायकवाड व मीनाताई गांगुर्डे यांनी कार्यक्रमाचे संयोजन करून रसिकांना  दिवाळीची सांगितिक मेजवानी  दिली.  ज्ञानेश्वर ठाकरे व संजय परमसागर यांनी सूत्रसंचालन केले. पावसे चिराग यांनी ध्वनी व्यवस्था संयोजन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आनंद उत्तम मित्रपरिवाराच्या पदाधिकारी व सदस्यांनी प्रयत्न केले.