'पोलीस आपल्या दारी' उपक्रम नाशिकरोड येथे संपन्न

'पोलीस आपल्या दारी' उपक्रम नाशिकरोड येथे संपन्न

नाशिक | दिनांक २१ मे २०२५: महाराष्ट्र शासनाच्या गृहखात्याच्या धोरणानुसार 'पोलीस आपल्या दारी' हा उपक्रम आज दुर्गामाता ज्येष्ठ नागरिक संघ, जेलरोड, नाशिकरोड येथे दुपारी १२.१५ वाजता पार पडला.

कार्यक्रमाला नाशिकचे पोलीस उप आयुक्त मा. मोनिका राऊत मॅडम आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक मा. संजीव फुलपगारे साहेब प्रमुख उपस्थित होते. यावेळी मा. मोनिका राऊत मॅडम यांनी ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या, तक्रारी यांचं मनपूर्वक ऐकून घेतलं आणि विविध सुरक्षाविषयक मार्गदर्शन केलं.

त्यानंतर त्यांनी पुढील सूचना दिल्या:

  • दागिने आणि रोख रक्कम शक्यतो घरातच ठेवावी, प्रवासाच्या वेळी ती घेऊन जाऊ नये.

  • संपत्ती किंवा पैसा मुलांच्या नावे करताना जिवंत असताना फार विचारपूर्वक निर्णय घ्यावा.

  • परिसरात कोणतीही संशयास्पद किंवा अवैध घटना दिसल्यास 112 क्रमांकावर त्वरित कॉल करावा; आपली ओळख गोपनीय ठेवली जाईल.

  • मोबाईलचा वापर काळजीपूर्वक करावा; अपरिचित मेसेजमधील लिंकवर क्लिक करू नये आणि खाजगी माहिती शेअर करू नये.

या उपक्रमाच्या माध्यमातून पोलिसांविषयीची भीती आणि गैरसमज दूर होण्यास मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

कार्यक्रमास दुर्गामाता ज्येष्ठ नागरिक संघाचे संस्थापक अध्यक्ष व मा. नगरसेवक श्री. शैलेशभाऊ ढगे, अध्यक्ष रमेश डहाळे, कार्याध्यक्ष मनोज चिमणकर, उपाध्यक्ष अशोक बागुल, दिलीप सोनोने, पंडितराव इंगळे, प्रमोद सानप, विजय मोरे, हेमराज चौधरी तसेच सौ. लता वाणी, सौ. उषा पाटील, सौ. ताराबाई बाहेती यांच्यासह अनेक ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.