राष्ट्रवादी युवक कॉँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळा

नाशिक (दि.२६ जून २०२५) – राजकारण, समाजकारण व जनहितासाठी हक्काचा माणूस अशी ओळख असणारे अंबादास खैरे यांचा वाढदिवस शुक्रवार २७ जून पंचवटी येथे पदाधिकारी, कार्यकर्ते, हितचिंतक, स्थानिक नागरिक आणि त्यांच्या चाहत्यांच्या उपस्थितीत साजरा होणार आहे.
राष्ट्रवादी युवक कॉँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांचा वाढदिवस दरवर्षी विविध सामाजिक उपक्रम व जनहिताचे कार्यक्रमाने मोठ्या उत्साहात साजरा होत असतो. या वर्षी देखील अंबादास खैरे यांच्या वाढदिवसानिमित्त “सन्मान नारीशक्तीचा सोहळा भाऊंच्या वाढदिवसाचा” हा महिलाकरिता भव्य मेळावा घेण्यात येणार असून प्रमुख अतिथी म्हणून मेट कॉलेजच्या संचालिका डॉ. शेफाली भुजबळ, राष्ट्रवादी महिला कॉँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष प्रेरणा बलकवडे, शहाराध्यक्षा योगिता आहेर व महिला भारत श्री बॉडी बिल्डर स्नेहाताई कोंकणे-पाटील उपस्थित राहणार आहेत.
वाढदिवसाचे औचित्य साधून भव्य महिला मेळावा सकाळी १०.३० वाजता दिपलक्ष्मी मंगल कार्यालय, जुना आडगाव नाका येथे होणार आहे. सायंकाळी ६.३० वाजता विविध क्षेत्रातील मान्यवर, राजकीय नेते, जेष्ठ नागरिक, माता-भगिनी व मित्र परिवार, पदाधिकारी, कार्यकर्ते, हितचिंतक, स्थानिक नागरिक आणि त्यांच्या चाहत्यांच्या उपस्थितीत केक कापून वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळा पार पडणार आहे. तरी या अभिष्टचिंतन सोहळ्यास आपली सर्वाची उपस्थिती प्रार्थनीय आहे. आपण सर्वजण आपले शुभ आशीर्वाद व शुभेच्छा देण्यासाठी आवर्जून उपस्थित राहावे असे आवाहन राष्ट्रवादी युवक कॉँग्रेस, अ. भा. महात्मा फुले समता परिषद, नाशिक, त्रिमूर्ती नगर सांस्कृतिक कला व क्रिडा मंडळच्या वतीने करण्यात आले आहे.
=============================================================================================================