ना.पंकजाताई मुंडे यांच्या त्या विधानाचा विपर्यास. - सुनील केदार

ना.पंकजाताई मुंडे यांच्या त्या विधानाचा विपर्यास. - सुनील केदार

भाजप नेत्या व मंत्री ना.पंकजाताई मुंडे या रविवारी ९ फेब्रुवारी रोजी विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने नाशिक दौऱ्यावर आल्या होत्या.या दौऱ्यात भाजप नाशिक महानगर जिल्हा सरचिटणीस म्हणुन मी त्यांच्याबरोबर होतो.नाशिक पंचवटीत बळी मंदिराजवळ दिंडोरी प्रणित गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्या पुढाकाराने भव्य कृषी प्रदर्शन आयोजित केले होते त्या कृषी प्रदर्शनाला ना.पंकजाताई मुंडे यांनी भेट दिली व भाषण केले. सुरुवातीला आयोजकांच्या वतीने डॉ. दिगपाल गिरासे यांनी प्रास्ताविक केले.डॉ.दिगपाल गिरासे हे लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या निकटवर्तीयांपैकी एक आहे.यावेळी त्यांनी मुंडे साहेबांच्या आठवणींना उजाळा देत म्हटले की गोपीनाथराव मुंडे साहेब यांचे संबंध महाराष्ट्र राज्यात इतके फॅन व हितचिंतक आहे की ते जर सर्वजण एकत्र आले तर एक नविन राजकीय पक्ष ऊभा राहील. डॉ. दिगपाल गिरासे हे जे बोलले त्यामागे कोणतेही राजकारण नव्हते तर त्यांच्या मनात गोपीनाथराव मुंडे यांच्याविषयीचा असलेला आदर व स्नेहभाव होता. तोच संदर्भ धरून पंकजाताई मुंडे बोलल्या की डॉ.दिगपाल गिरासे बोलले ते बरोबर आहे. मुंडे साहेब यांना मानणारा सर्व जातीधर्माचा इतका मोठा वर्ग राज्यात आहे की एक राजकीय पक्ष ऊभा राहील. त्यामागे हेतु फक्त आणि फक्त गोपीनाथराव मुंडे यांच्यावरील अपार श्रध्दा व त्यांची लोकप्रियता किती होती हे सांगण्याचा प्रयत्न होता.

पण वर्तमान पत्रातून उलट सुलट बातम्या आल्या व त्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाल्या. वास्तविक ज्यांनी महाराष्ट्रात भाजप मोठा केला. वाड्या, वस्त्या, तांडे, खेडोपाडी भाजप पक्षाची पाळेमुळे रोवली त्यांच्या कन्या पंकजाताई मुंडे आज त्याच भाजप पक्षाच्या नेत्या आहेत व राज्यात कॅबिनेट मंत्री आहेत. केंद्रात व राज्यात भाजप सत्तेवर आहे.असे असताना त्या दुसरा नविन राजकीय पक्ष कशाला काढतील ? हा खरा प्रश्न आहे.परंतु काही तरी स्फोटक विधान एखाद्या नेत्याच्या मुखामधून वदवून घ्यायचे व त्याची हॉट बातमी कशी होईल अशा बातम्या टी आर पी वाढविण्याकरिता द्यायच्या हेबरोबरनाही.तथापि या कार्यक्रमाचा मी साक्षीदार असुन अशा प्रकारचे कोणतेही भाजप पक्ष विरोधी वक्तव्य ना.पंकजाताई मुंडे यांनी केले नसुन त्या कालही भाजप बरोबर होत्या,आजही व भविष्यातही राहतील असे भाजप नाशिक महानगर जिल्हा सरचिटणीस व कादवा सहकारी साखर कारखान्याचे संचालक सुनील केदार यांनी पत्रकाव्दारे म्हटले आहे.