के. व्ही. एन. नाईक महाविद्यालयात 'महाराष्ट्र दिन' 'मराठी राजभाषा दिन' व 'कामगार दिन' उत्साहात साजरा

सिन्नर: (प्रतिनिधी) क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण प्रसारक संस्थेचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सिन्नर येथे 'महाराष्ट्र दिन' , 'मराठी राजभाषा' दिन व 'कामगार दिन' उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी संस्थेचे विश्वस्त नामदेवराव काकड, संस्थेचे संचालक समाधान गायकवाड, संस्थेचे संचालक हेमंत नाईक, तुकाराम सांगळे (माजी सरपंच माळेगाव), गोकुळ आंधळे (सह्याद्री करिअर अकॅडमी) तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर पखाले इ. मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संस्थेचे संचालक हेमंत नाईक यांनी भूषवले. कार्यक्रमाची सुरुवात अध्यक्ष व इतर मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहणाने करण्यात आली. विद्यार्थिनींनी महाराष्ट्र गीताचे गायन केले. याप्रसंगी प्रा. अमोल आव्हाड व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर पखाले यांनी सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या व कामगार दिनाच्या शुभेच्छा देत महाराष्ट्राची अस्मिता जपण्याचा सल्ला दिला. कार्यक्रमाचे अध्यक्ष हेमंत नाईक यांनीही सर्वांना शुभेच्छा देत महाराष्ट्राची संस्कृती व परंपरा अबाधित ठेवणे आपले कर्तव्य असल्याचे प्रतिपादन केले.
याच कार्यक्रमाचे औचित्य साधून कु. आदिती सुभाष सांगळे (एस. वाय.बी.कॉम) या विद्यार्थिनीने ऑल इंडिया स्तरावर पॉवर लिफ्टिंग स्पर्धेमध्ये जम्मू तावी श्रीनगर येथे आपला सहभाग नोंदवून महाविद्यालयाचे नाव उंचवल्याबद्दल तिचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. तसेच महाविद्यालयातून ११ वी कला, वाणिज्य व विज्ञान विभागातून प्रथम क्रमांक पटकाविलेल्या विद्यार्थ्यांचा देखील मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमाचा समारोप विद्यार्थ्यांना खाऊवाटप करून करण्यात आला.सदर कार्यक्रमास प्रा. संतोष आव्हाड, प्रा. पुनम कुटे, प्रा. डॉ. मंगल सांगळे, वरिष्ठ लिपिक रामराजे आदींसह सर्व प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ
ज्योती गायकवाड यांनी केले तर प्रा. ज्ञानेश्वर चकोर यांनी आभार व्यक्त केले.