पिंपळगाव बसंवत- १. ०५. २०२५
मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या पिंपळगाव बसवंत येथील कर्मवीर काकासाहेब वाघ कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी प्रोफे (डॉ.) सुरेश जाधव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी स्थानिक व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रा. रवींद्र मोरे, पुंडलिक निरगुडे, भीमराव मोरे, जयवंत निरगुडे, उपप्राचार्य प्रा. दिलीप माळोदे, प्रा. हेमंत पाटील, स्थानिक व्यवस्थापन समितीचे सदस्य आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी प्रा. रवींद्र मोरे यांनी महाराष्ट्र दिन, मराठी राजभाषा दिन आणि कामगार दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या.