बिटको महाविद्यालयात इ.१२ वी एचएससी परिक्षेतील गुणवंतांचा गौरव सोहळा संपन्न

बिटको महाविद्यालयात इ.१२ वी एचएससी  परिक्षेतील गुणवंतांचा गौरव सोहळा संपन्न

नाशिकरोड :- गोखले एज्युकेशन सोसायटीच्या नाशिकरोड येथील बिटको महाविद्यालयात  फेब्रुवारी/ मार्च २०२५ मध्ये  झालेल्या इ.१२ वी कला, वाणिज्य व विज्ञान तसेच एचएसव्हीसी तील गुणवंत विद्यार्थ्यांचा महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य डॉ. कृष्णा शहाणे यांनी पेढे, गुलाबपुष्प व गुणपत्रिका देऊन सन्मानित केले. याप्रसंगी  महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. कृष्णा शहाणे यासह कनिष्ठ महाविद्यालयाच्या पर्यवेक्षिका प्रणाली पाथरे , सौ. आर. एस. पाटील, शालिनी शेळके, योगेश महाजन, संदीप आरोटे, संजय परमसागर , मीना शिंदे , भूषण कोतकर , मनीषा देशमुख यासह शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी, सत्कारार्थी विद्यार्थी व पालक आदी उपस्थित होते. सत्कारार्थी विद्यार्थ्यांना प्राचार्य डॉ. कृष्णा शहाणे यांनी यथोचित मार्गदर्शन करतांना ई. १२ वीचा अभ्यास हा महत्त्वाचा टप्पा सर केला आहे. हे क्षण आयुष्यात स्मरून अधिक जोमाने पुढे वाटचाल करा. योग्य ध्येय ठरवा. सातत्याने वाचन सुरू ठेवा. आपले आरोग्य जपा असे सांगून गुणवंत विद्यार्थ्यांना भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे प्रस्ताविक पर्यवेक्षिका प्रणाली पाथरे यांनी करतांना कला शाखेचा निकाल ८१.२१ % तर वाणिज्य शाखेचा ९७.०५% तर  विज्ञान शाखेचा  ९७.८१ % तसेच एच.एस.सी. व्होकेशनल विभागाचा निकाल १०० % लागला असल्याचे सांगितले . गुणवंत विद्यार्थ्यांचा  घोषित निकाल घोषित केला. यात प्रथम, द्वितीय व तृतीय अनुक्रमे खालीलप्रमाणे:-

कला शाखा:-

कु.श्रेया संतोष कांबळे (५२९/ ६००) - ८८.१७ %,

कु.कोमल सुहास पगारे (४९२/ ६००) - ८२ %

कु.नम्रता प्रवीण बडगुजर (४९१/ ६००) -  ८१. ८३ %

वाणिज्य शाखा:-

कु.उत्तरा शैलेंद्र गिरासे (५६३/६००) - ९३.८३ %

मोहम्मद अली वासीम खान पठाण (५६१/६००) - ९३.५० %

 कृष्णा दिलीप गवारे (५५९/६००) -९३.१७  %

विज्ञान शाखा :-

आरुष रियाज शेख  (४७१/६००)- ७८.५० %

कु. मानसी भगवंत जाधव (४६३/६००)- ७७.१७ % शर्विल संदीप निकुंभ (४५८/६००)- ७६.३३ %

एच.एस.सी.व्होकेशनल शाखा :-

सोनम बजरंगी यादव (एमएलटी )- (४९०/६००) - ८१.६७ %

 तेजस खंडू वारुंगसे (ईएलटी )- (३५२/६००) - ५८. ६७%

याप्रसंगी विद्यार्थ्यांनी व पालकांनी मनोगते व्यक्त करताना शिक्षकांप्रती आदरभाव व्यक्त करून त्यांच्या मार्गदर्शनामुळे व पालकांच्या सहकार्यामुळेच सुयश प्राप्त झाल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौं. शालिनी शेळके यांनी केले. सौ. आर. एस. पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले.

For enrollment fill the form  https://forms.gle/b5baa7QSdwJKRDpo8