सेवी स्कूल ऑफ डिझाईन अँड टेक्नॉलॉजी महाविद्यालयात प्रोफेशनल टेलरिंग कोर्स चे मोफत प्रशिक्षण

सेवी स्कूल ऑफ डिझाईन अँड टेक्नॉलॉजी  महाविद्यालयात प्रोफेशनल टेलरिंग कोर्स चे मोफत प्रशिक्षण

नाशिक रोड येथील नंदकिशोर भुतडा फाउंडेशन सेवी स्कूल ऑफ डिझाईन अँड टेक्नॉलॉजी महाविद्यालयात शासन मान्यताप्राप्त प्रोफेशनल टेलरिंग कोर्स चे प्रमाणपत्र वाटप.

          नाशिक : अर्टिलेरी सेंटर रोड नाशिक रोड येथील सेवी स्कूल ऑफ डिझाईन अँड टेक्नॉलॉजी  महाविद्यालयात नेहमी वेगवेगळे नवनवीन उपक्रम राबविण्यात येत असतात त्या पैकीच स्वयंशक्ती आयोजित स्त्री उद्यमी विकास अंतर्गत सूक्ष्म, लघु एवं मध्यम उद्यम , डेव्हलपमेंट अँड फेसिलीटेशन ऑफिस, मुंबई(MSME DFO,Mumbai) ह्याच्या मार्फत शासन मान्यता प्राप्त प्रोफेशनल टेलरिंग कोर्स चे मोफत प्रशिक्षण विद्यार्थिनींना देण्यात आले.  या प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र वितरणाचा सोहळा २७/११/२०२३ रोजी  सेवी स्कूल ऑफ डिझाईन अँड टेक्नॉलॉजी  महाविद्यालयात  संपन्न झाला.

 या कार्यक्रमाच्या वेळी  सेव्ही स्कूल ऑफ डिझाईन अँड टेक्नॉलॉजीच्या संचालिका श्रुती भुतडा व त्यांच्या महाविद्यालयाचे प्रशिक्षक म्हणून नवाल काझी ,सविता भोर, ऐश्वर्या गांगुर्डे ,उपस्थित राहिले.

   या कार्यक्रमाच्या अध्यक्ष म्हणून शासनातर्फे  श्री. सुनील खूजणारे, असिस्टंट डायरेक्टर,सूक्ष्म, लघु एवं मध्यम उद्यम , डेव्हलपमेंट अँड फेसिलीटेशन ऑफिस, मुंबई(MSME DFO,Mumbai) व  दिपाली चांडक लाभल्या यांच्या हस्ते उपस्थित विद्यार्थिनींना प्रमाणपत्र वितरित करण्यात आले तसेच विद्यार्थिनींना पुढील वाटचालीसाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या  या शासन मान्यता प्राप्त प्रोफेशनल टेलरिंग ह्या कोर्सच्या विद्यार्थिनींनी प्रशिक्षणा दरम्यान त्यांना मिळालेल्या प्रशिक्षणाचे भरभरून कौतुक केले तसेच या प्रशिक्षणात विद्यार्थिनींना ब्लाऊज स्टिचिंग, ड्रेस स्टिचिंग,  बेबी गारमेंट स्टिचिंग, वन पीस टिचिंग, अशा विविध प्रकारचे शिक्षण त्यांना देण्यात आले याच बरोबर करियर गायडन्स, बँकिंग ,मार्केटिंग, अकाउंटिंग ,या विषयांचे देखील त्यांना शिक्षण देण्यात आले.

   या कार्यक्रमाच्या शेवटी संचालिका श्रुती भुतडा यांनी आभार व्यक्त केले.

या कार्यक्रमा करीता स्वयंशक्ती संस्थेच्या समन्वयक सौ.राधिका पवार, स्वाती माळी तसेच सेवी स्कूल  आणि स्वयंशक्ती ची संपूर्ण टीम यांनी विशेष परिश्रम घेतले.