डॉ. मंगल कचरू सांगळे यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची विद्यावाचस्पती (पीएच. डी.) ही पदवी जाहीर

के. व्ही. एन. नाईक कॉलेज सिन्नर येथे राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी व मराठी वाङ्मय विभाग प्रमुख म्हणून कार्यरत असलेल्या कवयित्री व लेखिका तसेच महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा सिन्नरच्या कोषाध्यक्ष डॉ. मंगल कचरू सांगळे यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची विद्यावाचस्पती (पीएच. डी.) ही पदवी जाहीर झाली आहे. जागतिकीकरण आणि आंबेडकरवादी कविता या विषयावर त्यांनी डॉ. रावसाहेब ननावरे यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन कार्य पूर्ण केले.
के. व्ही. एन. शिक्षण संस्थेचे अध्यक्ष कोंडाजी (मामा )आव्हाड, उपाध्यक्ष उदयभाऊ घुगे, सेक्रेटरी हेमंत (आप्पा) धात्रक, सहसेक्रेटरी दिगंबर गीते, सर्व पदाधिकारी,सिन्नर संचालक मंडळ विश्वस्त नामदेवराव काकड, संचालक जयंत बाबू आव्हाड, संचालक समाधान गायकवाड, संचालक हेमंत नाईक, संचालिका सौ.नंदाताई भाबड तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर पखाले, समन्वयक डॉ. बाळासाहेब चकोर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे मराठी विभाग प्रमुख डॉ. तुकाराम रोंगटे, डॉ. उदय जाधव, संगमनेर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण गायकवाड, संशोधन केंद्र समन्वयक डॉ. अशोक लिंबेकर, डॉ. राहुल हांडे आदींनी त्यांचे अभिनंदन केले. डॉ. मंगल सांगळे यांनी नेट-सेट परीक्षा सहा वेळेस उत्तीर्ण केलेली असून पुणे विद्यापीठातून पत्रकारितेची पदवी मिळवलेली आहे तसेच फिल्म अँड टेलिव्हिजन एडिटिंग देखील मुंबई विद्यापीठातून पूर्ण केलेले आहे. त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.