प्राचार्य डॉ. कृष्णा शहाणे यांना साहित्य परिषद कोल्हापूरचे साहित्य भूषण पुरस्कार जाहीर

नाशिक (प्रतिनिधी) साहित्य परिषद कोल्हापूर यांच्या वतीने दिले जाणार आहे 2025 चे साहित्य भूषण पुरस्कार जाहीर झाले आहेत.
साप्ताहिक गंगाधर आणि साहित्य परिषद कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने दिल्या जाणाऱ्या या पुरस्कारांमध्ये ज्येष्ठ साहित्यिक श्रीराम पचींद्रे, बिटको चे प्रभारी प्राचार्य डॉ. कृष्णा शहाणे, ग्रामीण साहित्यिक बबनराव पोतदार आदींची निवड झाल्याची घोषणा कोल्हापूर साहित्य परिषदेचे अध्यक्ष आणि साहित्य संमेलनाचे संयोजक कमलाकर वर्टेकर यांनी केली.
कोल्हापूर येथे होणाऱ्या राष्ट्रीय परिसंवाद आणि साहित्य संमेलनात सदर पुरस्कार वितरित केले जातील.
डॉ.शहाणे हे अर्थशास्त्र आणि शेती या विषयातील जाणकार असून एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठ मुंबई यांनी प्रसिद्ध केलेल्या 15 आणि एकूण 19 क्रमिक पुस्तकांचे ते लेखक म्हणून ते प्रसिद्ध आहेत.
मुलुंड कॉलेज ऑफ कॉमर्स मुलुंड मुंबई, के.टी. वझे केळकर कॉलेज मुंबई, गुरुनानक खालसा कॉलेज मुंबई या विद्यापीठ दर्जा असलेल्या स्वायत्त महाविद्यालयांच्या अर्थशास्त्र अभ्यास मंडळाच्या सदस्य पदी (B.O.S.) कार्यरत असून त्यांचा अभ्यासक्रम तयार करण्याच्या कार्यात त्यांचा सहभाग आहे.
आर्थिक घडामोडी, शेती समस्या या विषयावरील ते स्तंभ लेखक आहेत. दैनंदिन वर्तमानपत्रे साप्ताहिके आणि नियतकालिके यातून अर्थ आणि शेती तसेच चालू घडामोडी या विषयावरील त्यांचे अनेक लेख प्रसिद्ध झालेले आहेत. अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय चर्चासत्रातून त्यांनी शोध निबंध सादर केलेले आहेत याशिवाय आकाशवाणीवरून अर्थ विषयावर त्यांची अनेक व्याख्याने प्रसारित झालेली आहेत. त्यांनी पुणे विद्यापीठातून नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादन आणि विपणनाचे अर्थशास्त्र या विषयात पीएच.डी. पदवी संपादन केलेले आहे.
त्यांच्या निवडीबद्दल गोखले एज्युकेशन सोसायटीच्या सेक्रेटरी प्राचार्य डॉ.सौ. दीप्ती देशपांडे, संस्थेचे अध्यक्ष श्री आर. पी. देशपांडे, विभागीय सचिव प्राचार्य डॉ. राम कुलकर्णी, संस्थेचे कुलसचिव श्री गिरीश नातू, शाखा सचिव प्राचार्य डॉ. व्ही. एन. सूर्यवंशी, सहाय्यक शाखा सचिव उपप्राचार्य डॉ. प्रणव रत्नपारखी आदींसह अनेकांनी अभिनंदन केले आहे.