सातपूर महाविद्यालयात जागतिक एड्स दिन सप्ताह उत्साहात साजरा

मविप्रसंस्थेचे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सातपूर, नाशिक राष्ट्रीय सेवा योजना विभाग व रेडरिबन क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने एड्स जनजागृती सप्ताह निमित्त विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले एड्स जनजागृती रॅली चे आयोजन सातपूरमहाविद्यालय परिसरात करण्यात आले.समुपदेशकश्रीमती अश्विनी भोसले यांचे तसेच टी.बी संसर्ग आणि घ्यायची काळजी या विषयावर मायको हॉस्पिटलच्या टेक्निशियन श्रीमंती हेमांगीनी जोशी यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.
डॉ.मनिता कोठावदे मेडिकल ऑफिसर त्रंबकेश्वर यांचे “महिला आरोग्य जनजागृती” या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले त्यांनी आपल्या मनोगतात स्त्रियांचे आरोग्य चांगले टिकविण्यासाठीस्रीयांनी सकस आहार घ्यावा असे त्यांनी आपल्या मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य.श्री.एस.एस तावडे हे होते तर राष्ट्रीय सेवा योजनेचा कार्यक्रम अधिकारी एम.डी शेंडगे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले व महिला कार्यक्रमाधिकारी एस. एस. गांगुर्डे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्रीमती .एन.डी .काळे यांनी केले .