राजमाता अहिल्या माता होळकर जयंतीनिमित्त विचारांचा जागर – चरित्रमाला पुस्तकांचे वितरण

नाशिक – राष्ट्रवादी काँग्रेस नारोड विभागाच्या वतीने राजमाता अहिल्या माता होळकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा जागर करत "कर्तबगार राज्यकर्ती अहिल्या माता होळकर" या चरित्रमाला पुस्तकांचे वितरण करण्यात आले.
या कार्यक्रमाला विभागाध्यक्ष मनोहर मामा कोरडे, प्रा. हेमंत कांबळे, रविकिरण घोलप, उत्तम फडोळ, मंगेश लांडगे, जयंती अध्यक्ष नितीन धानापुणे यांच्यासह समाजबांधव अंबादास औशीकर, दत्तात्रय ढिकले, रमेश लवटे, राजेंद्र लहांगे, गौतम पगारे, अरविंद भालेराव, रमेश ताजनपुरे, रमेश रितेश केदारे, राकेश कांबळे, जय शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या माध्यमातून अहिल्या माता यांच्या प्रेरणादायी कार्याचा गौरव करत, सामाजिक बांधिलकीचे भान ठेवून विचारप्रवण जागर करण्यात आला.