अमरकुमार प्रस्तुत ' यादो की सरगम ' सदाबहार संगीत मैफिलीत रसिक मंत्रमुग्ध...
नाशिकरोड :- " ये शाम मस्तानी, जाने जा ढूंढता फिर रहा, जो गुजर रही है मुझ पर, ओ सजना बरखा बहार आयी, बाहो मे चले आओ, वादा रहा सनम, वक्त का परिंदा, दिल का सुना साज तराना ढूंढेगा, लागा चुनरी मे दाग, तू ही रे, ओ प्रिया क्यू भुला दिया, परदेसी परदेसी जाना नहीं, समा है सुहाना, कव्वाली परदा है परदा, प्रियतमा ओ मेरी प्रियतमा, मेरे ढोलना, ए मेरे हमसफर, तेरे हाथोमे पहना के चुडिया , " अशी एकाहून एक सरस हिंदी चित्रपटातील हृदयस्पर्शी अजरामर गाणी गायकांनी सादर करून रसिकांची मने जिंकली .
निमित्त होते ते नाशिकरोड येथील अमरकुमार प्रस्तुत आशा मेलोडी मेकर्स वतीने आयोजित गाजलेल्या हिंदी चित्रपटातील कराओके ट्रॅक गाण्यांवर आधारित ' यादों की सरगम ' या सदाबहार हृदयस्पर्शी चित्रपट गीतांचे गुरुवार दि.९ जानेवारी २०२५ रोजी स्वार्णिमा हॉल, इंदिरानगर येथे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी गायकांनी सादर केलेल्या गाण्यांना उपस्थित रसिकांनी उस्फुर्त दाद देऊन मनस्वी आनंद घेतला .कार्यक्रमाचा प्रारंभी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात येऊन सुरुवात करण्यात आली . या कार्यक्रमाचे संयोजन अमरकुमार करोशिया यांनी केले होते . स्वतः अमरकुमार यासह संजय परमसागर, गॉडविन लुईस, राजेश पुराणिक, विजय राठोड , भाग्यश्री गायधनी , स्नेहा केदारे , श्वेता डोके, कल्पना पुराणिक, राजेंद्र सिंग, संदीप सावंत, फारुखभाई शेख यांनी विविध गाजलेली गाणी सादर केली. याप्रसंगी गायक घनश्याम पटेल, संजय डेरे, हरीश ठक्कर, प्रशांत चंद्रात्रे, आशिष भट, दिलीप सोनवणे, योगेश महाजन, एच. पी. कुरेशी , योगेश सोनवणे, सलीम शेख, संजय रासकर, मोहन पवार, सदानंद कटकढोंड, संजय साळवे, अजय पाटील, सुबोध मिश्रा , सलीम शेख आदी मान्यवर उपस्थित होते . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिनेश गोवील यांनी केले तर ध्वनी व्यवस्था पवन रोकडे यांनी सांभाळली .