पवार कोचिंग क्लासेसच्यावतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा थाटात संपन्न

पवार कोचिंग क्लासेसच्यावतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा थाटात संपन्न

पवार कोचिंग क्लासेसच्यावतीने आयोजित गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळा मोठ्या उत्साहात व सन्मानपूर्वक पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून करण्यात आली.

या सोहळ्यात यंदाच्या वर्षी परीक्षेत यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्हप्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. या प्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवरांचे उपस्थितीत कार्यक्रमाला विशेष स्वरूप लाभले.

प्रमुख उपस्थित मान्यवरांमध्ये

  • पोलीस उपनिरीक्षक राहुल काकडे,

  • ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष दिनेश निकाळे,

  • बसपा शहर अध्यक्ष प्रसाद जमखिंडीकर,

  • शिवेतज संघटना अध्यक्ष हारून शेख,

  • ब्लॉक अल्पसंख्यांक काँग्रेस अध्यक्ष तोफीक शेख,

  • सामाजिक कार्यकर्त्या अरुणा आहेर,

  • शाहिद शेख

  • किशोर कटारे
    यांचा समावेश होता.

कार्यक्रमाचे संयोजन प्रा. सुजाता पवारब्लॉक काँग्रेस उपाध्यक्ष सुनील निरभवणे यांनी केले होते.

उत्कृष्ट नियोजन, विद्यार्थ्यांचा उत्साह आणि मान्यवरांचे मार्गदर्शन यामुळे हा कार्यक्रम अत्यंत यशस्वी ठरला.