श्री सप्तश्रुंगी कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात आयोजित आंतरराष्ट्रीय जागतिक योगदिन

श्री सप्तश्रुंगी कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात आयोजित आंतरराष्ट्रीय जागतिक योगदिन
श्री सप्तश्रुंगी कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात आयोजित आंतरराष्ट्रीय जागतिक योगदिन

आजच्या धक्काधक्कीच्या भौतिक जीवनात सुखसोयी करिता माणसाला सातत्याने वाढत जाणा-या स्पर्धेला समोरे जावे लागते. माणसाची मानसिक आणि शारीरिक स्थिती बिघडत आहे. परिणामी माणूस ताणवग्रस्त आणि चिंताग्रस्त बनून अनेक प्रकारच्यामानसिक व शारीरिक आजारपणात तो अडकला आहे, या नैराश्यग्रस्त आणि ताणवग्रस्त अवस्थेतून माणसाला सुस्थितीत येण्यासाठी योगाभ्यासाची नितांत गरज आहे. त्यायोगे माणसाचे मानसिक आणि शारीरिक संतुलन चांगले आबाधित राहील. चांगले आरोग्य वटिकवून ठेवण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने शास्त्रशुद्ध योगासने करणे ही काळाची गरज बनत आहे. असे प्रतिपादन तुळजाभवानी एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष मा. संजय पंडितराव सोनवणे यांनी केले.

श्री सप्तश्रुंगी कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात आयोजित आंतरराष्ट्रीय जागतिक योगदिन कार्यक्रम प्रसंगी मा. सोनवणे अध्यक्ष म्हणून बोलत होते. यावेळी प्राचार्य जाधव पी. एम, योगप्रशिक्षक  तिसगे सर, प्रा. आर. डी. नाडेकर (IQAC समन्वयक), प्रा रीना बाविस्कर, (रासेयो अधिकारी), सर्व  प्राध्यापक, प्राध्यापिका उपस्थित होते.

प्रास्तविकात प्राचार्य जाधव. पी. एम यांनी सप्तश्रुंगी महाविद्यालयातील क्रीडा व एनएसएचे विद्यार्थी उपस्थित होते.