औद्योगिक प्रशिक्षण संस्था चांदवड येथील COPA व्यवसायामधील प्रशिक्षणार्थ्यांनी OJT अंतर्गत डिजिटल मार्केटिंग आणि ई-कॉमर्स या विषयाचे प्रशिक्षण
औद्योगिक प्रशिक्षण संस्था चांदवड येथील COPA व्यवसायामधील प्रशिक्षणार्थ्यांनी OJT अंतर्गत डिजिटल मार्केटिंग आणि ई-कॉमर्स या विषयाचे प्रशिक्षण, AVS Technology, Nashik यांचे मार्फत देण्यात आले. यामध्ये विद्यार्थ्यांना डिजिटल मार्केटिंग विषयी आणि ईकॉमर्स बद्दल विस्तृत माहिती देण्यात आली . विद्यार्थ्यांनी स्वतःचे ऑनलाईन शॉप तयार करून त्यावरून विक्री कशी करावी व त्याचे ऑनलाईन मार्केटिंग कसे करावे याचे प्रात्यक्षिक करून दाखविले.
भविष्यकाळात त्यांना या प्रशिक्षणाचा फायदा होईल असे अनेक विद्यार्थ्यांनी सांगितले . यामध्ये त्यांना AVS Technologies चे मुख्य संचालक श्री विनोद बर्वे सर आणि ITI चांदवड चे निदेशक धनंजय दंडगव्हाळ सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. याप्रसंगी त्यांना प्रमाणपत्र चे वाटप माननीय प्राचार्य श्रीयुत भदाणे सर यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी व्यवसायाचे शिल्प निदेशक श्री दंडगव्हाळ सर, गटनदेशक श्रीयुत वाघ सर, श्रीमती क्षीरसागर मॅडम, श्रीमती रूपाली गांगुर्डे मॅडम, आणि COPA व्यवसायातील सर्व प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.
यामध्ये पुढील विद्यार्थ्यांनी यशस्वीरीत्या प्रशिक्षण पूर्ण केले . तृणमेश संदिप पाटील ,पवन दिलीप शेळके,मयुरी राजेश कुशवाह,अक्षय बाबाजी घुले,रुपेश भाऊराव गांगुर्डे,श्रावणी संजय तांबे,प्रविण किसन अहिरे,गणेश रमण पवार,रोहित जगदीश अहिरे,साहिल राजेश साळवे,कुणाल नागेश्वर डोमाडे,कृष्णा नवनाथ चव्हाण ,तेजस संदिप गांगुर्डे ,गौरव शिवाजी सोनवणे,पल्लवी अनंत खडतळे,सुमित सुखदेव पाटील,शुभम गंगाधर जाधव,साहिल भाऊराव गांगुर्डे,तुषार विष्णू खैरे,राहुल अण्णा लोखंडे ,प्रथमेश सोमनाथ केदारे