व्ही एन नाईक सिन्नर महाविद्यालयात माजी ऊर्जामंत्री मंत्री स्वर्गीय लोकनेते तुकारामजी दिघोळे साहेब यांची ८४ वी जयंती साजरी

क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण प्रसारक संस्थेचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सिन्नर येथे माजी ऊर्जामंत्री मंत्री स्वर्गीय लोकनेते तुकारामजी दिघोळे साहेब यांची ८४ वी जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी संस्थेचे विश्वस्त नामदेवरावजी काकड व संस्थेचे संचालक समाधानजी गायकवाड व अथर्वजी, डॉक्टर महावीर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. संचालक समाधान गायकवाड यांनी आपल्या मनोगतातून स्वर्गीय लोकनेते तुकारामजी दिघोळे साहेब यांची राजकीय , सामाजिक व शिक्षण क्षेत्रातील कार्य मनोगतातून व्यक्त केले.तसेच संस्थेचे विश्वस्त नामदेवरावजी काकड यांनी लोकनेते तुकारामजी दिघोळे साहेब यांच्याविषयी आपले मनोगत व्यक्त केले व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पखाले के.डी यांनी देखील साहेबांच्या कार्याचा आढावा घेऊन अभिवादन केले. स.प्रा चोथवे मॅडम यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स. प्रा. वैशाली सानप यांनी केले व आभार स.प्रा.ज्ञानेश्वर चकोर यांनी मानले . कार्यक्रमाला सांस्कृतिक विभाग प्रमुख स. प्रा कुटे मॅडम . महाविद्यालयाचे सर्व सहाय्यक प्राध्यापक , सहाय्यक प्राध्यापिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.