नाशिक मनपाच्या २१ रुग्णालयांना कायाकल्प गुणवत्ता पुरस्कार

नाशिक | १३ जून २०२५:
नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानांतर्गत (NUHM) गुणवत्तेच्या उच्च निकषांवर आधारित कायाकल्प कार्यक्रमात उल्लेखनीय यश मिळवले आहे.
गुणवत्ता आश्वासन कार्यक्रमात नाशिक प्रथम स्थानावर
राज्यस्तरीय कायाकल्प कार्यक्रमांतर्गत नाशिक मनपाच्या एकूण २१ रुग्णालयांना १५ लाख रुपयांचे पारितोषिक जाहीर करण्यात आले आहे. आरोग्य सुविधा, स्वच्छता, जैव वैद्यकीय कचरा व्यवस्थापन, संसर्ग नियंत्रण यांसारख्या घटकांवर आधारित ही स्पर्धा दरवर्षी आयोजित केली जाते.
“नाशिककरांच्या आरोग्यविषयक सुविधा अधिकाधिक सुधारण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.” |
|
— डॉ. तानाजी चव्हाण, वैद्यकीय आरोग्य अधिकारी, नाशिक मनपा |
उत्कृष्ट रुग्णालये आणि बक्षिसे:
शहरी सामुदायिक आरोग्य केंद्र गटात – प्रत्येकी ₹१ लाखाचे प्रोत्साहन बक्षीस:
-
मायको सातपूर रुग्णालय
-
इंदिरा गांधी रुग्णालय, पंचवटी
-
श्री स्वामी समर्थ रुग्णालय, मोरवाडी
-
हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे रुग्णालय, नाशिक रोड
-
डॉ. झाकिर हुसैन रुग्णालय
शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र गटात –
प्रथम पारितोषिक ₹२ लाख: सिडको आरोग्य केंद्र
प्रथम उपविजेते ₹१.५ लाख: दसक आणि पंचक आरोग्य केंद्र
प्रोत्साहन बक्षीस ₹५०,००० – खालील केंद्रांना:
जिजामाता, उपनगर, संजीनगर, वडाळागाव, एमएचबी कॉलनी, पंचवटी, हिरावाडी, सिन्नरफाटा, गोरेवाडी, पिंपळगाव खांब, अंबड, सिव्हील हॉस्पिटल, मखमलाबाद, इंदिरा गांधी तपोवन.
सर्वांच्या सामूहिक प्रयत्नांची फळे
या उल्लेखनीय यशामागे नाशिक मनपा आयुक्त डॉ. मनिषा खत्री, अति. आयुक्त करिश्मा नायर यांचे दिशादर्शन तसेच आरोग्य विभाग प्रमुख डॉ. तानाजी चव्हाण यांचे नेतृत्व आहे.
शहर गुणवत्ता समन्वयक डॉ. हिना शेख, तसेच सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांचे कार्यही वाखाणण्याजोगे आहे.