सप्तशृंगी महाविद्यालयात शिव राज्याभिषेक सोहळा दिवस साजरा!

तुळजाभवानी एज्युकेशन सोशल अँड वेल्फेअर सोसायटी संचलित श्री सप्तशृंगी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय डांगसौंदाणे येथे शिव राज्याभिषेक सोहळा दिवस साजरा करण्यात आला, शिवराज्याभिषेक दिनानिमित्त महाविद्यालयातच्या आवारातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मानवंदना देऊन पुष्प अर्पण करण्यात आले. ह्या कार्यक्रम प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य जाधव पी.एम व राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी प्रा. आर. डी. नाडेकर हजर होते.
'हा दिवस रायगड किल्ल्यावरील शिवराज्याभिषेक सोहळा हा केवळ एक वार्षिक कार्यक्रम नाही; तर तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या चिरस्थायी वारसाचा जिवंत दाखला आहे. हा सोहळा इतिहास, संस्कृती आणि सामुदायिक भक्तीला एकत्र आणून स्वराज्य आणि प्रादेशिक अभिमानाचा एक शक्तिशाली उत्सव आहे.'. असे प्रतिपादन प्राचार्य जाधव यांनी केले.
ह्या कार्यक्रमासाठी प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी स्वयंसेवक हजर होते.