सायखेडा महाविद्यालयात राष्ट्रीय मतदार दिन उत्साहात साजरा.

सायखेडा महाविद्यालयात राष्ट्रीय मतदार दिन उत्साहात साजरा.

श्री स्वामी षट्कोपाचार्यजी महाराज कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय सायखेडा व राज्यशास्त्र विभाग आणि राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयांमध्ये २५ जानेवारी हा "राष्ट्रीय मतदार दिन" मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. ए. खैरनार, उपप्राचार्य डॉ. एस. व्ही. गोसावी, सकाळ सत्र प्रमुख शशिकांत पाटील, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी व राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा. अभिन पोटे, प्रा.कैलास गोपाळे, प्राध्यापिका वैशाली खालकर, उषा डेरले उपस्थित होते.

राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त सदर कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांना मतदान जनजागृती संदर्भात शपथ देण्यात आली व प्रा. अभिन पोटे यांनी राष्ट्रीय मतदार दिनाचे महत्त्व विशद करताना मतदान हा एक पवित्र हक्क आहेत.भारतीय लोकशाहीचे भविष्य मतदान प्रक्रियेवरती अवलंबून आहेत त्यामुळे लोकशाहीचे संरक्षण करण्यासाठी प्रत्येक जागरूक मतदाराने मतदान करणे आवश्यक आहे. जगाच्या पाठीवर भारत असा एकमेव देश आहेत की ज्याने स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारतातील सर्व सामान्य नागरिकांना देखील मतदानाचा अधिकार दिला त्यामुळे सर्वांनी मतदानासारखा पवित्र हक्क बजविणे अत्यंत गरजेचे आहेत. मतदाराची पात्रता ठरवितांना राज्यघटनेमध्ये जात-पात धर्म,वंश, लिंग, यासारखे कोणतेही भेदभाव केलेले नाही. सध्या भारतात २४ लाख मतदारांची नव नोंदणी झालेली आहे. असे प्रतिपादन केले.

सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रा. न्याहारकर, प्रा.कमानकर प्रा.मुरादे, प्रा.डॉ. सुनील धोंडगे, प्रा. गायकवाड,प्रा.पवार,प्रा. पावशे,प्रा. गावले, सौरव गावले यांचे योगदान लाभले.