वेदांत हॉस्पिटलतर्फे 'अवघा विठ्ठल' अभंगसंध्या कार्यक्रमाचे आयोजन

वेदांत हॉस्पिटलतर्फे 'अवघा विठ्ठल' अभंगसंध्या कार्यक्रमाचे आयोजन

नाशिक (प्रतिनिधी) – आषाढी एकादशीच्या निमित्ताने वेदांत हॉस्पिटलच्यावतीने आयोजित करण्यात येणाऱ्या विशेष अभंगसंध्येला रसिकांसाठी पर्वणी ठरणार आहे. "अवघा विठ्ठल" या अभंगसंध्येचे आयोजन येत्या रविवार, २९ जून २०२५ रोजी गुरुदक्षिणा हॉल, कॉलेज रोड, नाशिक येथे करण्यात आले आहे.

या कार्यक्रमात सुप्रसिद्ध गायिका सौ. रागिणी कामतीकर यांच्यासह इतर नामवंत कलाकारांची सादरीकरणे रसिकांच्या भेटीस येणार आहेत. कार्यक्रमाचे निवेदन सौ. स्मिता मालपूरे करतील.

कार्यक्रमाची वेळ अशी असेल:

  • सायंकाळी ५.३० वा.अल्पोपहार

  • सायंकाळी ६.०० वा."अवघा विठ्ठल" अभंगसंध्या

कार्यक्रमाचे प्रवेश सर्वांसाठी खुला असून, नाशिककरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून भक्तिरसात न्हालावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

कार्यक्रमाचे निमंत्रक आहेत –
डॉ. राजेंद्र नेहेते, डॉ. अनिता नेहेते, तसेच डॉ. हर्षद अढाव, डॉ. योगिता भामरे, डॉ. अभिषेक कुलकर्णी,डॉ. नेहा जैन आहेर, डॉ. संकेत नेहेते(वेदांत हॉस्पिटल परिवार)

या भक्तिरसपूर्ण संध्याकाळी रेडिओ पार्टनर म्हणून विश्वास रेडिओ ९०.८ कम्युनिटी रेडिओ यांचे सहकार्य लाभले आहे.