विश्वास को-ऑप. बँकेची 29वी वार्षिक सभा खेळीमेळीत संपन्न

नाशिक (प्रतिनिधी) : विश्वास को-ऑप. बँकेची 29वी वार्षिक सर्वसाधारण सभा विश्वास गार्डन, सावरकरनगर, नाशिक येथे खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी बँकेचे संस्थापक अध्यक्ष विश्वास लिलावती जयदेव ठाकूर होते.
यावेळी विश्वास लिलावती जयदेव ठाकूर यांनी बँकेच्या 29 वर्षांच्या वाटचालीचा व प्रगतीशीलतेचा आढावा घेतला. बँकिंग क्षेत्रातील झपाट्याने होणारे बदल, तंत्रज्ञानाची प्रगती आणि ग्राहकांच्या अपेक्षांमध्ये झालेली वाढ लक्षात घेता, विश्वास बँक ‘आधुनिक सेवा ग्राहकहित’ यांचा सुरेख समन्वय साधत आहे, त्यामुळेच आम्ही बँकिंग सेवा अधिक पारदर्शक, सुरक्षित आणि ग्राहकाभिमुख देत आहोत. विश्वास बँक अनेक डिजिटल उपक्रम राबवत आहे. मोबाईल बँकिंगचा विस्तार, ग्राहक सेवा प्रणाली आणि इंटरनेट बँकिंगच्या नव्या सोयी यामुळे सेवा अधिक कार्यक्षम व सुलभ झाली आहे, ही सर्वांसाठी गौरवाची बाब आहे, हे यश म्हणजे बँकेच्या कार्यक्षमतेची, पारदर्शकतेची आणि सभासद, ग्राहकांच्या विश्वासाची पावती आहे. बँकेच्या शिवाजीनगर (सातपूर) व उपनगर (नाशिकरोड) या दोन शाखांना रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची परवानगी मिळाली आहे. या शाखा जून 2025 मध्ये सुरू झाल्या आहेत. बँकेने या आर्थिक वर्षांत रु. 944 कोटी रुपर्यांपर्यंत मिश्र व्यवसाय केला असून येत्या आर्थिक वर्षात रु. 1000 कोटी व्यवसायापर्यंत लक्ष्य साध्य करेल हे निश्चितच हे आपल्या सर्वांच्या सामूहिक प्रयत्नांचेच यश आहे. बँकेच्या वैशिष्ट्यपूर्ण व्यवस्थापनप्रणालीमुळे दरवर्षी बँकेला पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येते याही वर्षी नाशिक जिल्हा नागरी सहकारी बँक्स् असोसिएशन, नाशिक तर्फे 501 ते 700 कोटीपर्यंत ठेवी असलेल्या बँकांच्या गटात द्वितीय न्युबा अवार्ड 2023-24 देऊन सन्मानित करण्यात आले तसेच महाराष्ट्र राज्य सहकारी बँक्स् असोसिएशन लि., मुंबई तर्फे पद्भूषण कै. वसंतदादा पाटील उत्कृष्ट नागरी सहकारी बँक पुरस्कार 2023-24 रु. 500 ते रु. 1000 कोटीपर्यंत ठेवी असणार्या विभागात जाहीर झालेला आहे. आपल्या बँकेचे मोबईल अॅप ही सुरू झाले आहे. त्यामुळे डिजीटल बँकिंगच्या स्पर्धेत बँक यशस्वीपणे ग्राहक सेवा देत आहे. ऋडथच (ऋळपरपलळरश्रश्रू र्डेीपव रपव थशश्रश्र चरपरसशव) या अंतर्गत तिडके कॉलनी येथे या आर्थिक वर्षांतील तिसरी शाखा सुरू होईल. बँकेच्या तब्बल 16 शाखा होत आहेत.
विश्वास बँकेच्या 31 मार्च 2025 अखेर एकूण ठेवी रु. 572 कोटी 75 लाख झाल्या असून कर्ज वाटप रु. 372 कोटी 03 लाख व सीडी रेशो 64.96% इतका आहे. बँकेचा एकूण व्यवसाय रु. 944 कोटी 78 लाखांपर्यंत पोहोचला आहे. बँकेला ढोबळ नफा रु. 7 कोटी 56 लाख व निव्वळ नफा रु. 4 कोटी 14 लाख झालेला आहे. बँकेचे भागभांडवल रु.18 कोटी 49 लाख असून सभासद संख्या 9 हजार 983 इतकी आहे, बँकेचा निधी रु.38 कोटी 75 लाख, गुंतवणूक रु. 193 कोटी 21 लाख, थकबाकी वसुली 98.16%, ग्रॉस एनपीए 3.84%, नेट एनपीए 2.09% सीआरएआर 15.30% तर खेळते भांडवल रु. 635 कोटी 01 लाख इतके आहे.
सभेचे सूत्रसंचालन बँकेचे मानद कार्यकारी संचालक मंगेश पंचाक्षरी यांनी केले. तर स्वागत संचालक डॉ. वासुदेव भेंडे यांनी केले. इतिवृत्त वाचन मंगेश पंचाक्षरी यांनी केले. श्रद्धांजलीचे वाचन संचालक डॉ. सुभाष पवार यांनी केले. विषय पत्रिकेचे वाचन अजित मोडक यांनी केले. त्याचप्रमाणे बँकेचे संस्थापक अध्यक्ष विश्वास ठाकूर, उपाध्यक्ष डॉ. चंद्रकांत संकलेचा, जनसंपर्क संचालक घनश्याम येवला, संचालक डॉ. वासुदेव भेंडे, डॉ. सुभाष पवार, विलास हावरे, कैलास पाटील, शशिकांत येवला, मंगला कमोद, मुख्य कार्यकारी अधिकारी सारिका देशपांडे तसेच अति. मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश बागुल यांनी विषय पत्रिकेनुसार विषयांची मांडणी करून प्रत्येक विषयावर सभासदांनी पारदर्शक चर्चा घडवून आणली, बँकेच्या सद्य स्थितीची व भविष्यातील ध्येय धोरणांची माहिती जाणून घेतली.
बँकेचे संचालक डॉ. सुभाष पवार यांनी आफ्रिका खंडातील सर्वात उंच व जगातील एक खांबी सर्वात उंच पर्वत किलीमांजारो (5895 मिटर) सर करून भारताचा झेंडा फडकवला. तसेच वयाच्या 69 व्या वर्षी एव्हरेस्ट शिखर गाठण्यासाठी कॅम्प 3 पर्यंत मजल मारली व 7100 मीटर उंची पर्यंत पोहोचणारे एकमेव भारतीय ठरले. याबद्दल बँकेचे मा. संचालक डॉ. कैलास कमोद यांच्या हस्ते डॉ. पवार यांचा सन्मान करण्यात आला.
सभेस बँकेचे व्यवस्थापन मंडळातील सदस्य डॉ. प्रशांतकुमार पाटील, अॅड. दत्तपसाद निकम, विनय अंधारे, प्रदिप गांगुर्डे, टी. बी. उशीर, विनायक रानडे, अमित शाह, राधिका कुलकर्णी, डॉ. हरी कुलकर्णी, सीमा सोनार, जगदीश सोनार, एम. एन. सैंदाणे, जी. आर. पोतदार, जयप्रकाश येवले, धनंजय ठाकूर, समर बॅनर्जी तसेच महाप्रबंधक सुरेश वाघ, किशोर त्रिभुवन, महेंद्र पवार, वरिष्ठ व्यवस्थापक भूषण भोसले, कैलास आव्हाड आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. आभार प्रदर्शन बँकेचे संचालिका सौ. वैशाली होळकर यांनी केले.