बिटको महाविद्यालयात स्व.पार्वतीबाई रायरीकर स्मृती पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात संपन्न . . 

बिटको महाविद्यालयात स्व.पार्वतीबाई रायरीकर स्मृती पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात संपन्न . . 

नाशिकरोड:_ " माजी प्राचार्य स्व.ह.मा. रायरीकर यांनी नाशिकरोड केंद्रातील  गुणवंत विद्यार्थ्यांना आपल्या मातोश्रीं स्व. पार्वताबाई रायरीकर यांच्या स्मरणार्थ गेल्या १४ वर्षांपासून सुरू केलेला स्तुत्य उपक्रम असून शालेय स्तरावरच विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार रुजतात . ' ज्ञान प्राप्तीस्तु भक्तीत:, विद्यार्थी देवो भव ' या ब्रीदतत्त्वावर संस्थेचे शिक्षणकार्य अविरत सुरु आहे. ज्येष्ठ शिक्षणतज्ञ सर स्व डॉ. मो. स. गोसावी व  रायरीकर दांपत्य यांचे आशीर्वाद व मोलाचे मार्गदर्शन या नाशिकरोड केंद्राच्या जडणघडणीत मोठे योगदान लाभलेले आहे . तसेच दर्जेदार शिक्षणातून ज्ञानदानाचे पवित्र कार्य करणारे विद्यार्थ्यांना घडवणारे सर्व नाशिकरोड केंद्रातील सर्व शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी व पालक यांचा मोलाचा वाटा आहे " असे अध्यक्षीय मार्गदर्शन करताना गोखले एज्युकेशन सोसायटीचे विभागीय सचिव डॉ. राम कुलकर्णी यांनी केले. 

        गोखले एज्युकेशन सोसायटीतील नाशिकरोड येथील बिटको  महाविद्यालयात नाशिकरोड केंद्र आयोजित शुक्रवार दि.२८ जुन २०२५ रोजी सेमिनार हॉलमध्ये  स्व. पार्वतीबाई रायरीकर स्मृती पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला. त्या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष - गोखले एज्युकेशन सोसायटी नाशिकचे विभागीय सचिव प्राचार्य डॉ.राम कुलकर्णी, विशेष अतिथी नितीन रायरीकर, सौ. मीनल रायरीकर -टाकळकर,नाशिकरोड शाखा सचिव डॉ. व्ही. एन. सूर्यवंशी, सहायक शाखा सचिव डॉ. प्रणव रत्नपारखी, कार्यक्रमाच्या संयोजक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.कृष्णा शहाणे , केंद्रीय शाळा समन्व्यक विनोद देशपांडे,शाळा पर्यवेक्षक शशिकांत त्रिभुवन , शालिनी खरे, अफरीन शेख आदी मान्यवर उपस्थित होते .

      प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते प्रिं. टी .ए.कुलकर्णी यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला.त्यानंतर सोसायटी गीत व सौ. जे. एस. कपाटे व गीत मंचच्या विद्यार्थ्यांचे स्वागतगीताने सुरुवात होऊन जेडीसी बिटको इंग्रजी शाळेचे मुख्याध्यापक डी. आर. नंदन यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व मान्यवरांचे स्वागत करून नाशिकरोड केंद्रातील यशस्वी वाटचालीचाआढावा सादर केला.मान्यवरांचा परिचय सौ. भक्ती कुलकर्णी यांनी उपस्थितांना  करून दिला.यानंतर मान्यवरांच्या हस्ते स्व. प्राचार्य ह. मा. रायरीकर यांच्या उदार देणगीतून नाशिकरोड केंद्रातील जयरामभाई हायस्कूल प्राथमिक व माध्यमिक तसेच जे.डी.सी .बिटको इंग्लिश मेडियम प्राथमिक व माध्यमिक हायस्कूलमधील इ. पहिली ते दहावी मधील प्रथम आलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना रोख पारितोषिक व प्रमाणपत्र वितरित करण्यात आले . नितीन रायरीकर, डॉ. व्ही. एन. सूर्यवंशी, डॉ. कृष्णा शहाणे,  विनोद देशपांडे यांनीही आपले यथोचित मनोगत  व्यक्त करतांना यश सहजासहजी मिळत नाही. त्यासाठी कष्ट, सातत्य  वाचनाची, छन्दाची आवड असावी, आई वडील व गुरुजनांना  विसरू नका, ध्यानधारणा करा, योग्य आहार व्यायाम करा असे सांगून गुणवंत विद्यार्थ्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या . मान्यवरांच्या हस्ते उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार वितरित करण्यात आले यात - 

 उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार -

१) जेडीसी प्रायमरी इंग्लिश मीडियम स्कूल-सौ. रोशना उघाडे

२) जेडीसी माध्यमिक इंग्लिश मीडियम स्कूल - श्री.अमोल साठे

३) श्री जयराम भाई प्राथमिक हायस्कूल  -सौ. गजरा जाधव

          कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  भक्ती कुलकर्णी यांनी तर मुख्याध्यापिका डॉ. अस्मिता देशपांडे यांनी आभार मानले . कार्यक्रमास नाशिकरोड केंद्रातील प्राथमिक व माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक  , शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, सत्कारार्थी गुणवंत  विद्यार्थी व पालक आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.