सिन्नर येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी
क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण प्रसारक संस्थेचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सिन्नर येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर पखाले यांच्या अध्यक्षतेखाली सदर कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
स्त्रियांना चूल व मूल या जोखडातून मुक्त करताना सावित्रीबाई फुले यांनी घेतलेल्या अपार परिश्रमाचा कार्यक्रमाच्या अध्यक्षांनी उल्लेख करत त्यांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन केले.
सदर कार्यक्रमास सांस्कृतिक विभाग प्रमुख स.प्रा.पूनम कुटे, विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. डॉ.ज्योती गायकवाड, क्रीडा विभाग प्रमुख स.प्रा. अमोल आव्हाड तसेच प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी स.प्रा. मंगल सांगळे यांनी केले. व परीक्षा विभाग प्रमुख स.प्रा. संतोष आव्हाड यांनी आभार मानले.