कर्मवीर गणपत दादा मोरे कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात महाराष्ट्र दिन ध्वजारोहण समारंभ संपन्न...

कर्मवीर गणपत दादा मोरे कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात महाराष्ट्र दिन ध्वजारोहण समारंभ संपन्न...

निफाड प्रतिनिधी ०१. ०५. २०२५

मविप्र समाज संस्थेच्या निफाड येथील कर्मवीर गणपत दादा मोरे कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
 मविप्र सभापती बाळासाहेब क्षीरसागर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी गीतमंचने राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीत गायले, व्यासपीठावर महाविद्यालयाचे नवनिर्वाचित प्राचार्य डॉ. ज्ञानोबा ढगे, स्था.व्य. समिती अध्यक्ष डॉ. उत्तम डेर्ले, अशोक वडघुले, जानकीराम धारराव, सुधाकर कापसे, प्रा अभय वडघुले, डॉ. प्रवीण ढेपले, प्रा. योगेश कडलग, प्रा चंद्रशेखर मोरे, प्रा चेतन कुंदे, डॉ. महेश बनकर, प्रा. शंकर गायकवाड, श्रीमती मनीषा कोटकर,  कार्या. अधीक्षक संजय गायकवाड व सर्व प्राध्यापक प्राध्यापिका उपस्थित होते.
यावेळी मविप्र सभापती बाळासाहेब   क्षीरसागर यांनी महाराष्ट्र दिन हा मराठी बांधवांसाठी सुवर्णक्षण असून मोठ्या त्यागातून तो आपल्याला प्राप्त झालेला आहे. राष्ट्र उभारणीत महाराष्ट्राचे योगदान मोठे असून यापुढे आपण देश सेवेसाठी अग्रभागी राहूया असे सांगून महाराष्ट्र दिन, मराठी राजभाषा दिन आणि कामगार दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रम यशस्वीेततेसाठी एन.सी.सी. प्रमुख शंकर गायकवाड, शा.शी. संचालक चंद्रशेखर मोरे व सर्व प्राध्यापक प्राध्यापके तर सेवक यांनी परिश्रम घेतले.
 कार्यक्रमाचे संयोजन आणि सूत्रसंचालन डॉ. महेश बनकर यांनी केले तर आभार चेतन कूंदे यांनी मानले