बिटको महाविद्यालयात जागतिक महिला दिन साजरा... विद्यार्थिनींनो अष्टवधानी रहा, सक्षम व्हा, तरच समर्थ्यवान व्हाल - डॉ. शुभांगी रत्नपारखी

बिटको महाविद्यालयात जागतिक महिला दिन साजरा... विद्यार्थिनींनो अष्टवधानी रहा, सक्षम व्हा, तरच समर्थ्यवान  व्हाल - डॉ. शुभांगी रत्नपारखी

नाशिकरोड :-   "  देश विकासाच्या दृष्टिकोनातून आज महिला प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर आहेत. अनेक वादळवाट पार करताना विविध दिव्य पार करावी लागतात. आज जशास तसे वागण्याची वेळ आली असून  प्रत्येक पावला पावले संकटे व समस्या आहेत. या संकटांचा प्रहार करण्याची क्षमता आपल्यात यायला हवी. म्हणूनच सक्षम व्हा, सामर्थ्यवान बनून अष्टावधानी व्हा. नकारात्मक गोष्टींचे दहन करून सकारात्मकपणे जीवनात मार्गक्रमण करा, " असे फिजिओथेरपिस्ट व सामाजिक कार्यकर्त्या डॉ. शुभांगी रत्नपारखी यांनी केले.

          सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ विद्यार्थीनी मंच व गोखले एज्युकेशन सोसायटीच्या नाशिकरोड येथील बिटको महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने ' जागतिक महिला दिना '  निमित्त ' समर्थ मी सक्षम मी ' या विषयावर डॉ. शुभांगी रत्नपारखी यांचे व्याख्यान आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी विचारमंचावर कार्यक्रमाच्या अध्यक्षा -प्राचार्या  डॉ. मंजुषा कुलकर्णी, विद्यार्थिनी मंच प्रमुख डॉ. कांचन निकम, सहा.प्रा. ज्योती पेखळे आदी उपस्थित होते. 

प्रमुख वक्त्या डॉ. शुभांगी रत्नपारखी यांनी या प्रसंगी महिलादिनाच्या शुभेच्छा देऊन महिलांच्या विविध प्रश्नांवर प्रकाश टाकला. कामाच्या ठिकाणी होणारे महिलांवरील अत्याचार आणि कायद्यांची भूमिका तसेच त्यांनी सायबर क्राईम मुळे स्त्रियांवर कश्या प्रकारे अत्याचार होत  होतात यावर देखील प्रकाश टाकून अंतर्मुख केले .स्वतःच परीक्षण करून आपण आपले व्यक्तिमत्त्व ओळख बनवून आणि त्यातून शिका असे प्रतिपादन केले.

          प्रारंभी मानवऱ्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. डॉ. कांचन निकम यांनी प्रास्ताविक केले. मान्यवरांचा परिचय डॉ. अर्चना पाटील यांनी करून दिला. 

        अध्यक्षीय मार्गदर्शन करताना प्राचार्या डॉ. मंजुषा कुलकर्णी यांनी, " स्त्रीसाठी प्रत्येक दिवस खास नसतो स्त्रीमुळे प्रत्येक दिवस खास असतो असे सांगून स्त्रीशिक्षणासाठी अनेक समाजसुधारकांनी प्रयत्न केले.  देश घडवण्यासाठी जितका वाटा पुरुषांचा आहे तितकाच वाटा स्त्रीयांचा आहे म्हणजेच एकाच रथाची दोन चाके आहेत. मोबाईलचा वापर महत्त्वाच्या कामासाठीच करा इतर वेळ वाचनामध्ये घालवा, ज्ञानपीपासू वृत्ती जोपासा, " असे सांगितले. 

        कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहा. प्रा. ज्योती पेखळे  यांनी केले आणि उपस्थितांचे आभार  सहा. प्रा. सुनिता अहिरे यांनी मानले. याप्रसंगी डॉ. विद्युल्लता हांडे, डॉ. मीनाक्षी राठी, डॉ. सुनिता रणाते, प्रा. वन्दना शेवाळे, डॉ. सोनल जोशी, कॉम्प्युटर विभागप्रमुख ए. एम. शेख,  सुरभी आहेर, डॉ. नीता केदार, सोनाली राऊत, वैशाली कपिले, माधुरी ढेमसे, जयश्री पाटील, ऐश्वर्या बर्वे, धनश्री बोडके, स्वप्ना कारखानीस, शुभांगी जावळे, अपूर्वा जोशी, सुरेखा टोचे, मेघा गोतराज यासह प्राध्यापिका,  शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थिनी आदि मोठया संख्येने उपस्थित होते.