कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय रावळगाव येथे कला महोत्सव उत्साहात संपन्न

रावळगाव :- श्री स्वामी समर्थ विद्याप्रसारक मंडळाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय रावळगाव येथे विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी नेहमीच वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येत असतात. याचाच एक भाग म्हणून माविद्यालयात वार्षिक कला महोत्सवाचे आयोजन श्री स्वामी समर्थ विद्या प्रसारक मंडळ डांगसौंदाणे ता. बागलाण जि.नाशिक या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री सुरेश दादाजी वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. या महोत्सवात ट्रॅडिशनल डे, ब्लॅक अँड व्हाईट डे, चॉकलेट डे, संगीत खुर्ची, साडी डे, टाय डे, मिस मॅच डे रंगोळी डे, मेहंदी डे, फॅन्सी ड्रेस डे, भारताच्या विविधतेत एकतेचे प्रतिक असणाऱ्या व राष्ट्रीय एकात्मता दर्शवणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अंगी असलेले विविध काला गुण- कौशल्य दाखवता येतील असे विविध उपक्रम राबवून कला महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.
कला महोत्सव उत्साहात रावळगाव सारख्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी भारतातील विविध राज्यातील वेगवेगळ्या संस्कृतीचे दर्शन घडविणारी मनमोहक वेशभूषा करून विविधतेत एकतेची परंपरा जपत भारतीय संस्कृतीचे दर्शन घडविले. सदर उपक्रमामध्ये भाग्यश्री माळेकर, दिशा रौंदल, दिव्या जाधव, वैभवी बच्छाव, मानसी खैरनार, साक्षी बोरले, ऋतुजा गोसावी, पवार निकिता, सायली मानकर, जानवी जाधव, प्रणाली आखाडे, वैशाली सोळुंके, चेतना काथेपुरी, तन्वी गायकवाड, दिगंबर दंडगव्हान, सुशील पवार, रोहन खैरनार, मयूर अहिरे, चेतन पाटील, निखील पवार, या विद्यार्थ्यांनी सर्वोत्तम भारतीय संस्कृतीचे दर्शन घडविणारी वेशभूषा परिधान केले तर वैभवी बच्छाव या विद्यार्थिनीने चॉकलेट पासून विविध कलाकृती सदर केल्या, तर समाधान दाभाडे या विद्यार्थ्याने जादूचे प्रयोग करून दाखवले होते. यावेळी सदर उपक्रमाच्या परीक्षक म्हणून प्रा. निलेश देवरे, प्रा. मनीष ठोके, प्रा. राज ठाकरे, प्रा. कामेश गायकवाड, प्रा. अकेश दुकळे, प्रा. वर्षा पवार, प्रा. गीतांजली खैरनार, प्रा. चेतना हिरे यांनी काम पाहिले. यासाठी सांस्कृतिक कार्यक्रम अधिकारी प्रा.अंबादास पाचंगे, कला महोत्सव संयोजक प्रमुख, प्रा. शरद आंबेकर, समन्वयक महेंद्र पगारे, यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.
विविधतेत एकतेची परंपरा जपत भारतीय संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या व आपल्या अंगीचे कला गुण कौशल्य सदर करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. वाय. व्याळीज, उपप्राचार्य प्रा. जितेंद्र मिसर, कार्यालयीन अधीक्षक श्री दिपक पवार, यांनी सहभागी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. महाविद्यालयाच्या वतीने राबविण्यात आलेल्या या कला महोत्सवात विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.