व्ही एन नाईक सिन्नर महाविद्यालयात वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांसाठी इंडस्ट्रियल व्हिजिट संपन्न.

व्ही एन नाईक सिन्नर महाविद्यालयात वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांसाठी इंडस्ट्रियल व्हिजिट संपन्न.

दिनांक ०३/०३/२०२५ रोजी क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण प्रसारक संस्था संचलित कला ,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सिन्नरची 

सह्याद्री फार्म(मोहाडी),PMEA Solar Tech Solutions Limited(जानोरी)

या ठिकाणी इंडस्ट्रियल व्हिजिट करण्यात आली यावेळी विद्यार्थ्यांनी नाशिक जिल्ह्यातील मोहाडी येथील सह्याद्री फार्म या कंपनीत भेट देऊन फॉर्मची विविध उत्पादने, कंपनीत शेतमालावर प्रक्रिया करून शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव मिळवून देण्याच्या दृष्टिकोनातून ग्राहकांच्या पसंतीनुसार कृषी उत्पादने बाजारात कशा पद्धतीने उपलब्ध करून देतात याची माहिती घेतली. या भेटी दरम्यान सह्याद्री फार्मचे जनसंपर्क अधिकारी अंकित विजय वडघुले यांनी विद्यार्थ्यांना सह्याद्री फार्मची संपूर्ण माहिती सांगून व्हिडिओ डॉक्युमेंटरी द्वारे कशा पद्धतीने प्रोसेसिंग होते याचा व्हिडिओ दाखविला, तसेच द्राक्ष, केळी,पेरू,डाळिंब तसेच सर्व प्रकारच्या फळांवर प्रक्रिया करून कशा पद्धतीने विदेशामध्ये पाठवले जाते याची माहिती विद्यार्थ्यांना दिली.

त्यानंतर विद्यार्थ्यांनी PMEA Solar Tech Solutions या कंपनीमध्ये विद्यार्थ्यांनी व्हिजिट करून HR स्वप्नील आव्हाड सर यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या कंपनीची संपूर्ण माहिती, प्रोसेसिंग वर्क याबद्दल विद्यार्थ्यांना माहिती दिली. त्यानंतर महाविद्यालयातर्फे कंपनीच्या सर्व टीमचे आभार सहाय्यक प्राध्यापिका सुजाता दिघे यांनी मानले. या भेटी दरम्यान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.किशोर पखाले, Success Placement चे Director गणेश आव्हाड ,वाणिज्य विभागातील स.प्रा.सानप मॅडम, स.प्रा.झाडे मॅडम , स.प्रा. प्रशांत गायकवाड उपस्थित होते.