सिन्नर व्ही एन नाईक महाविद्यालयात निर्भय कन्या अभियान उपक्रम अंतर्गत विद्यार्थ्यांना स्वसंरक्षण प्रशिक्षण

सिन्नर व्ही एन नाईक महाविद्यालयात निर्भय कन्या अभियान उपक्रम अंतर्गत विद्यार्थ्यांना स्वसंरक्षण प्रशिक्षण

सिन्नर: (प्रतिनिधी) क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण प्रसारक संस्थेचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सिन्नर येथे दि. 22 फेब्रुवारी 2025 रोजी विद्यार्थी विकास मंडळ अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या ' निर्भय कन्या अभियान' या उपक्रमामध्ये विद्यार्थिनींना स्वसंरक्षणासाठी ' तायक्वांदो प्रशिक्षण ' देण्यात आले. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून नितीन सानप (टेक्निकल डायरेक्टर तायक्वांदो ) , संस्थेचे विश्वस्त नामदेवरावजी काकड, संस्थेचे संचालक समाधानजी गायकवाड तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर पखाले उपस्थित होते.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संस्थेचे संचालक नामदेवराव काकड यांनी भूषवले. याप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक नितीन सानप यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना स्वसंरक्षणाचे महत्त्व पटवून देत तायक्वांदो  प्रशिक्षणातील काही महत्त्वाच्या प्रकारांची स्वरक्षणासाठी प्रात्यक्षिके करून दाखवले. संस्थेचे संचालक समाधान गायकवाड यांनी देखील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना विद्यार्थिनींनी शिक्षणाबरोबरच आत्मनिर्भर होणे ही काळाची गरज असल्याचे आपल्या मनोगतातून सांगितले. तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर पखाले यांनीही विद्यार्थ्यांशी संवाद साधत असताना विद्यार्थिनींना सक्षम बनवण्यासाठी भविष्यात देखील महाविद्यालयाकडून वेगवेगळे उपक्रम राबवण्यात येतील असे आश्वासन विद्यार्थिनींना दिले. आपल्या अध्यक्षीय मनोगतामधून नामदेवराव काकड यांनी देखील विद्यार्थिनींना शिक्षण घेता घेता सक्षम बना असा सल्ला दिला. 

या कार्यक्रमात महाविद्यालयातील कला, वाणिज्य व विज्ञान वरिष्ठ विभागातून एकूण 75 विद्यार्थिनींनी आपला सहभाग नोंदविला. या सर्व विद्यार्थ्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले. 

या कार्यक्रमास परीक्षा विभाग प्रमुख स.प्रा.संतोष आव्हाड, क्रीडा विभाग प्रमुख स.प्रा.अमोल आव्हाड तसेच सर्व सहाय्यक प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थी विकास अधिकारी स.प्रा. डॉ. ज्योती गायकवाड यांनी तर सांस्कृतिक विभाग प्रमुख स.प्रा. पुनम कुटे यांनी उपस्थित  सर्वांचे आभार व्यक्त केले.