नाशिक जिल्हा विभागीय क्रीडा समिती व के व्ही एन नाईक कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सिन्नर यांच्या संयुक्त विद्यमानाने आंतरमहाविद्यालयीन पावर लिफ्टिंग स्पर्धांचे आयोजन

नाशिक जिल्हा विभागीय क्रीडा समिती व के व्ही एन नाईक कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सिन्नर यांच्या संयुक्त विद्यमानाने आंतरमहाविद्यालयीन पावर लिफ्टिंग स्पर्धांचे आयोजन

क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण प्रसारक संस्थेचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सिन्नर येथे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ नाशिक जिल्हा विभागीय क्रीडा समिती व के व्ही एन नाईक कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सिन्नर यांच्या संयुक्त विद्यमानाने आंतरमहाविद्यालयीन पावर लिफ्टिंग स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. 

सदर कार्यक्रमाचे औचित्य साधत  क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण प्रसारक संस्थेचे विश्वस्त नामदेवराव काकड, संचालक समाधान गायकवाड, जयंत आव्हाड उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सिन्नर पोलीस स्थानकातील पी. आय संभाजी गायकवाड उपस्थित होते. कार्यक्रमाचे उदघाटन सिन्नरची कन्या, राष्ट्रीय कुस्तीपटू स्वरदा रामकृष्ण आव्हाड उपस्थित होत्या.  

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर पखाले यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. तसेच महाविद्यालयाचे समन्वयक डॉ. बाळासाहेब चकोर ह्यांनी देखील स्पर्धा आयोजनाचा हेतू स्पष्ट केला. तसेच भविष्यात विविध क्रीडा स्पर्धा व इतर नवीन संकल्पना राबविणार असल्याचे आपल्या मनोगतातून व्यक्त केले.  

"आपल्या देशातील मुलींनी क्रीडा क्षेत्रात जास्तीत जास्त सहभाग घेतला तर आपली पद, प्रतिष्ठा वृद्धिंगत करू शकतो" असे प्रतिपादन कार्यक्रम उदघाटन प्रसंगी स्वरदा आव्हाड ह्यांनी केले. 

कार्यक्रमाचे अध्यक्ष पी. आय. संभाजी गायकवाड ह्यांनी देखील तरुण वयात जिद्दीने आपण नावलौकिक मिळवावा असा संदेश आपल्या भाषणातून दिला. 

व्ही. एन. नाईक संस्थेचे संचालक जयंत आव्हाड ह्यांनी देशातील मुलींना शारिरीकदृष्ट्या सशक्त होण्याचा सल्ला दिला. सदर स्पर्धेसाठी ५० महाविद्यालयांतील स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. इतका उदंड प्रतिसाद मिळाल्यामुळे उत्साही वातावरणात स्पर्धा पार पडल्या. यावेळी नाशिक जिल्हा  विभागीय क्रीडा सचिव प्रा. चेतन आव्हाड हे देखील उपस्थित होते.

   स्पर्धेच्या नियोजनात महाविद्यालयाचे प्रभारी क्रीडा संचालक सहा. प्रा. अमोल आव्हाड ह्यांनी मेहनत घेतली. तसेच त्यांना महाविद्यालयातील प्राचार्य डॉ. किशोर पखाले, समन्वयक डॉ. बाळासाहेब चकोर ह्यांचे मार्गदर्शन व सर्व प्राध्यापक, विद्यार्थी व प्राध्यापकेतर कर्मचारी ह्यांचे सहकार्य लाभले. 

        सदर कार्यक्रम प्रसंगी महाविद्यालयातील परीक्षा विभाग प्रमुख सहा. प्रा. संतोष आव्हाड, सांस्कृतिक विभाग प्रमुख सहा.प्रा. पूनम कुटे, राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी सहा. प्रा. मंगल सांगळे, विद्यार्थी विकास मंडळ अधिकारी सहा. प्रा. डॉ.ज्योती गायकवाड, इतर महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहा.प्रा. अमोल आव्हाड ह्यांनी केले.

For Enrollment : https://forms.gle/XfZhCL8UVrZftdRm9