कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय रावळगाव येथील वनस्पतीशास्त्र विभागातर्फे जनजागृती करून " जागतिक मृदा दिवस " साजरा .
रावळगाव :- मृदेची होत चाललेली धूप व त्यामुळे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी श्री स्वामी समर्थ विद्या प्रसारक मंडळ डांगसौंदाणे ता. बागलाण जि. नाशिक संचलित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय रावळगाव ता. मालेगाव जि. नाशिक येथील वनस्पतीशास्त्र विभागातर्फे दि. ५ डिसेंबर २०२४ रोजी जनजागृती करून " जागतिक मृदा दिवस " साजरा करण्यात आला.
जागतिक अन्नसुरक्षेच्या दृष्टीने मृदेचं महत्व अन्यसाधारण असं आहे. अलिकडच्या काळात झपाट्याने वाढतच चालेले शहरीकरण, सिमेंटचे रस्ते यामुळे मृदेची अधिक प्रमाणात झीज होत आहे. त्याचबरोबर शेतीमध्ये वापरण्यात येणारी भरमसाठ रासायनिक खते, शहरीकरणासाठी आणि उद्योगधंद्यांसाठी करण्यात येणारी जंगलतोड आणि इतर अनेक कारणांमुळे मृदेची झीज होण्याची प्रक्रिया मोठ्या प्रमाणात सुरु आहे. केवळ एक इंच सुपीक मृदेचा थर तयार होण्यासाठी ८०० ते १००० वर्षांचा कालावधी लागतो.
माती प्रदूषण थांबविण्यासाठी प्लास्टिकचा वापर टाळा. पर्यावरणास अनुकूल, बागकाम, साफसफाईची आणि वैयक्तिक काळजीची उत्पादने निवडा.बॅटरीसारख्या घातक कचर्याची जबाबदारीने विल्हेवाट लावा.आपला अन्न कचरा कंपोस्ट करा वनस्पती-आधारित आहार घ्या. वृक्षतोडीमुळे जमिनीतील कार्बन कमी होत असून, त्यातील तग धरून ठेवण्याची क्षमता कमी होत आहे. तर रस्ते, जमीन, बागेतील पालापाचोळा,ओले गावात म्हणजे कचरा असल्याचे मानत ते स्वच्छ केले जाते.त्यामुळे जमिनीची धूप वाढत आहे. असे दिसून येत आहे. त्यामुळे जमिनीची धूप रोखने अत्यंत महत्वाचे आहे .असे प्रतिपादन वनस्पतीशास्त्र विभागाच्या प्रमुख प्रा. अदिती काळे यांनी केले.
हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी प्रा. प्रा. प्रांजल पवार यांनी विशेष प्रयत्न केले. या उपक्रमात स्नेहल देशमुख, निकिता चव्हाण , प्रगती चव्हाण, सुशील आव्हाड , मेघा बच्छाव , दर्पण सोनार, देव भाटिया, कार्तिक सोनवणे, यांच्यासह महाविद्यालयातील अनेक विद्यार्थी उपस्थित होते. वनस्पतीशास्त्र विभागातर्फे राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे कौतुक श्री स्वामी समर्थ विद्या प्रसारक मंडळ डांगसौंदाणे ता. बागलाण जि. नाशिक या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री. सुरेश दादाजी वाघ तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. वाय. व्ह्याळीज यांनी केले.
For Enrollment : https://forms.gle/XfZhCL8UVrZftdRm9