सातपूर महाविद्यालयाचे वासाळी येथे विशेष श्रमसंस्कार शिबिराचे उद्घाटन संपन्न
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे मराठा विद्या प्रसारक समाजाचे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सातपूर यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रमसंस्कार शिबिर बुधवारदिनांक 15/1/2025 रोजी वासाळी येथे महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष नंदकिशोर घाटोळ यांच्या हस्ते करण्यात आले त्यांनी आपल्या मनोगतात स्वयंसेवकांना आपल्या शैक्षणिक जीवनातील राष्ट्रीय सेवा योजनेचे महत्त्व विविध उदाहरणाच्या साह्याने पटवून दिले या योजनेमुळे स्वयंसेवकाच्या जीवनाला एक प्रकारे वळण लागत असते असे त्यांनी विचार व्यक्त केले तसेच महाविद्यालय विकास समितीचे सदस्य ऍडव्होकेट प्रभाकर निवृत्ती खराटे यांनी मनोगत व्यक्त केले शिबिराच्या माध्यमातून ग्रामीण भागातील लोकांचा विचारांचा मागोवा आपल्याला मिळत असतो आपण एक जबाबदार व्यक्ती बनत असतो ही एक अत्यंत प्रभावी योजना आहे असे त्यांनी व्यक्त केले वासाळी गावच्या प्रथम नागरिक व
सरपंच श्रीमती आशा उत्तम खेटरे या प्रसंगी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना शिबीर यशस्वीतेसाठी शुभेच्छा दिल्या तसेच गावचे माजी सरपंच शांताराम नामदेव चव्हाण यांनी हीं मनोगत व्यक्त करून तरुण म्हणजे देशाचे भवितव्य आहे असे मत व्यक्त केले. या प्रसंगी जि. प. प्राथमिक शाळा वासाळी चे मुख्यध्यापक श्री. हेमंत पाटील हेहीं उपस्थित होते.सदर शिबिराचे उत्कृष्ट नियोजन महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. एस. एस. तावडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. कार्यक्रममाचे सूत्रसंचालन प्रा. श्रीमती. व्ही. पी. मोगल यांनी केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीयसेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा एम.डी शेंडगे यांनी केले.
आभारप्रदर्शन महिला कार्यक्रमधिकारी अधिकारी एस. एस.गांगुर्डे यांनी केले उद्घाटन प्रसंगी महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी आपला महत्त्वपूर्ण सहभाग नोंदवला अशा पद्धतीने कार्यक्रम उदघाटन समारंभ पार पडला